Boy Molestation(Photo Credits: ANI)

पुण्यात एका सहा वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्य म्हणजे ह्या मुलावर अत्याचार करणारे दोन्ही आरोपी देखील अल्पवयीन असल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. ह्या दोन आरोपींपैकी एक 13 वर्षाचा असून दुसरा 12 वर्षाचा आहे. पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरुन ह्या दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलगा हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याला नीट मांडी घालून बसता देखील येत नव्हते. म्हणून त्याच्या आईला काही तरी संशय आला आणि तिने त्याला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर पीडित मुलाने आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. ह्या मुलाला पुढील उपचारासाठी दुस-या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

3 वर्षीय अल्पवयीन मुलाचे 12 वर्षीय मुलाकडून लैंगिक शोषण,आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद

हा पीडित मुलगा आणि दोन्ही आरोपी एकाच गावात राहणारे आहेत. लैंगिक अत्याचाराप्रकरणी ह्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपी अल्पवयीन असल्या कारणाने त्यांची रवानगी बाल सुधारगृहात केली जाणार आहे.