मुंबईतील वांद्रे आणि धारावी येथे आज (18 जानेवारी) आणि उद्या (19 जानेवारी) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर धारावी येथे 1500 मिमी व्यासाची जलवाहिनी, 1450 मिमी व्यासाची अप्पर वैतरणा मुख्य जलवाहिनी जोडणीच्या काम करण्यात येणार आहे. त्यामुळेच नागरिकांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने दोन दिवस पुरेल एवढ्याच पाण्याचा साठा करुन ठेवावा अशी सुचना देण्यात आली आहे.
जलविहीनीचे काम 14 तास सुरु राहणार असल्याने या काळात जी/उत्तर आणि एच/पूर्व विभागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. आज दुपारी 12 वाजता जलवाहिनी जोडणीच्या कामाला सुरुवात होणार असून उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा केली जात आहे.(Mumbai Marathon 2020: Best Bus सेवांच्या मार्गांमध्ये मोठे बदल; काही ठिकाणी बस सेवा राहणार बंद)
आज जी उत्तर भागातील धारावी येथील मेन रोड, गणेश मंदिर रोड, ए.के.जी नगर रोड, कुंभारवाडा, संत गोराकुंभार रोड आणि दिलीप कदम मार्ग येथे बंद राहणार आहे. तर उद्या जी/उत्तर विभाग मधील प्रेमनगर, नाईक नगर, 60 फिट रोड, जस्मिन मिल रोड, मांटुंगा लेबर कॅम्प, एम. जी. रोड, धारावी लूप रोड, संत रोहिदास रोडसह वांद्रे टर्मिनस परिसरात सुद्धा पुर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.