Best Bus New Timetable: जर तुम्ही प्रवासासाठी बेस्ट सेवेचा वापर करत असाल तर या रविवारी मात्र थोडी खबरदारी घ्या कारण बेस्ट सेवेकडून आपल्या काही बसमार्गाच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. 1 जानेवारी रोजी (रविवारी), सकाळी मुंबई मॅरेथॉनमुळे काही ठिकाणी बससेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे तर काही बसेसचे वेळापत्रक व मार्ग बदलण्यात आले आहेत.
रविवारी 1 जानेवारी रोजी सकाळी 5 ते सकाळी ते दुपारी 1.30 या वेळेत मॅरेथॉनमुळे काही मार्गांवरील बेस्ट बस सेवा प्रभावित होतील असे बेस्ट अधिकाऱ्याने मिरर ऑनलाईन या वृत्तसेवेला सांगितले आहे. या वेळेत, सीएसटी- कोलाबा मार्गावर नियमितपणे जाणाऱ्या बेस्टच्या बसेस पीडी मेलो रोड आणि शाहिद भगतसिंग रोड मार्गे वळविण्यात आल्या आहेत.
भिंडी बाजार, महात्मा फुले मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, शमा प्रसाद मुखर्जी या मार्गांवर बेस्टची सेवा बंद असणार आहे. तर कुलाबा, आरसी चर्च, नेव्ही नगर या मार्गांवरील बसेस सरदार वल्लाभाई पटेल मार्ग, वाडी बंदर, पीडी मेल्लो, शाहिद भगतसिंग मार्गे वळविण्यात येणार आहेत. तसेच पंडित पलुस्कर चौक, पोर्तुगीज चर्च आणि माहीम या मार्गांवर धावणार्या बेस्ट बस सेवा नाना चौक, वसंतराव नाईक चौक, वत्सलाबाई देसाई चौक, महालक्ष्मी रेस कोर्स, ई-मोसेस रोड, आचार्य अत्रे चौक, जी.एम. येथून वळवण्यात येणार आहेत. हे बदल रविवारी दुपारी दीड वाजेपर्यंतच लागू असतील.
मुंबई मध्ये 27 जानेवारीपासून मॉल, हॉटेल्स 24x7 खुली राहू शकतात
105, 106, 108, 112, 123, 125, 132, 133, 136 आणि 155 हे दहा बेस्ट बस मार्ग रविवारी दुपारी 1:30 पर्यंत बंद असणार आहेत. तसेच मेयो रोड, चर्चगेट स्टेशन, वाळकेश्वर, कमला नेहरू पार्क, वरळी डेअरी, वरळी गाव आणि ग्रांट रोड (वेस्ट) येथील बेस्ट चौकी दुपारी दीड वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.