
Mumbai: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महिल्यांच्या खासगी आयुष्यावरुन होणाऱ्या टीप्पणीवरुन बोलल्या आहेत. त्याचीच आता चर्चा सुरु झाली आहे. अमृता फडणवीस यांनी असे म्हटले की, महिलांना खुप काही सहन करावे लागले आहे. तसेच त्यांच्या खासगी आयुष्यावर ही टिप्पणी करु नये किंवा त्यापासून दूर रहावे. मात्र देशात आणि राज्यात हेच होते. कोणीही बोलले की लेच आंदोलन केले जाते. त्यामुळे बोलण्यापूर्वी काळजी घ्यावी असे ही अमृता फडवणीस यांनी म्हटले आहे.
तसेच एखाद्या नेत्याने त्याच्या बायकोला कुठेतरी पार्टनर केल्यास, कंपनीत पदाधिकारी केले किंवा तेथे घोटाळा झाल्यास आणि त्यावर आक्षेप घेतला गेल्यास त्या महिलेवर टीका करु नये, या व्यतिरिक्त राज्यातील प्रश्न सोडवण्याऐवजी जर तुम्ही तुमचेच खिसे भरत असाल तर हे मात्र चुकीचे असल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले.(Bandatatya Karadkar On Supriya Sule: कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांचे सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान, म्हणाले 'सिद्धही करुन दाखवू शकतो')
तसेच महाविकास आघाडी सरकारवर ही अमृता फडणवीस यांनी टीका केली आहे. त्यांनी असे म्हटले की, महावसुली सरकारची जी कामे सुरु आहेत त्याबद्दल जग सुद्धा बोलत आहे. प्रत्येकावर वेगवेगळी कारवाई केली जाते. तसेच मला सुद्धा काही सामाजिक गोष्टींचा त्रास होतो. त्यात खड्डे असो किंवा अन्य कोणत्या गोष्टी. मी एक सामान्य स्री म्हणून घराबाहेर पडते. मात्र बायका मला माझे मानसिक संतुलन ढासळल्याचे म्हणातात. पण असे काही नाही आहे.