Representational Image (Photo Credits: Facebook)

भररस्त्यात 25 वर्षीय तरुणीचा पाठलाग करुन तिचा विनयभंग (Molestation) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मुंबई (Mumbai) येथील मालाड (Malad) परिसरात 1 जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील चौकशीला सरुवात केली आहे. पीडित तरुणी आपल्या बहिणीसोबत रात्री 10 च्या सुमारास घरी परतत असताना आरोपीने तिचा पाठलाग करुन तिचा विनयभंग करायला सुरुवात केली. परंतु, त्यावेळी काही लोक संबंधित ठिकाणी जमा झाल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. पीडित तरुणीने दुसऱ्या दिवशी स्थानिक पोलिस स्थानकात जाऊन आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.

फहीम शेख असे आरोपीचे नाव असून तो मालवणी परिसरात राहणारा आहे. तसेच फहीम एका मॉलमध्ये स्टोअर मॅनेजर म्हणून काम करतो. एक जानेवारी 2020 रोजी पीडित तरुणी तिच्या बहिणीसोबत रात्री 10 च्या सुमारास आपल्या घरी परतत होती. त्यावेळी आरोपी फहीम शेख याने पीडित तरुणीचा पाठलाग करायला सुरुवात केली. तसेच 'क्या माल लग रही है... मेरे साथ सोने चल', असे म्हणत फहीमने पीडित तरुणीचे केस ओढू लागला. परंतु, पीडित तरुणीने याकडे दुर्लक्ष केल्यानंतर फहिम तिला स्वत:जवळ खेचले. त्यानंतर फहीमने पीडिताच्या कानशिलात लगावली आणि ती वेश्या असल्याचे बोलू लागला. त्यावेळी संबंधित ठिकाणी काही लोक जमा झाल्यानंतर फहिमने तिथून पळ काढला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पीडित तरुणीने स्थानिक पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी फहिमला अटक केली. हे देखील वाचा-ठाणे: बदलापूर शहरातील एका फ्लॅटमध्ये सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला

पीडिताने दिलेल्या माहितीनुसार, माझी बहिण आमच्या दोघांमध्ये आल्यावर फहीमने तिला ढकलून दिले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर काही लोक तिथे जमा झाल्यावर तो आरोपी पळून गेला. दुसऱ्या दिवशी तरुणीने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर चौकशी करून पोलिसांनी फहीमला अटक केली.