ठाणे: बदलापूर शहरातील एका फ्लॅटमध्ये सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला
Representational Image (Photo Credits: Facebook)

ठाणे (Thane) येथील बदलापूर (Badlapur) शहरात एका प्लॅटमध्ये सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना रविवारी पहाटे घडली असून स्थानिक पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. मयत मूळचे दिल्ली येथील रहवाशी असून ते आपल्या पत्नीसोबत गेल्या तीन दिवसांपूर्वी मुंबईत आला होते. परंतु, रविवारी पहाटे त्यांच्या घरातून धूर येऊ लागल्याने परिसरातील लोकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

गुड्डू सिंह असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गुड्डू हे गेल्या काही वर्षापूर्वी नौदलातून सेवा निवृत्त झाले असून ते आपल्या कुटुंबियांसोबत दिल्ली येथे राहत होते. गुड्डू सिंह यांनी काही वर्षापूर्वी मुंबईतील बदलापूर परिसरात एक प्लॅट खरेदी केला होता. हाच प्लॅट विकण्यासाठी गुड्डू सिंह गेल्या तीन दिवसांपूर्वी आपल्या पत्नीसह मुंबईत आले होते. परंतु, रविवारी रात्री 1.30 वाजता त्यांच्या प्लॅटमधून धूर येऊ लागला. यानंतर सोसायटीच्या रहिवाश्यांनी याची माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून गुड्डू सिंह यांचा दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांना गुड्डू सिंह यांचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. हे देखील वाचा- उल्हासनगर: चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला पेटवलं; नराधम पती फरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुड्डू यांच्यासोबत त्यांची पत्नीदेखील मुंबईत आल्या होत्या. परंतु, ज्यावेळी पोलीस घटनास्थळी गेली होती. तेव्हा गुड्डू यांच्या पत्नी कुठेही दिसल्या नाहीत. पोलिसांना एक वेगळा संशय आला असून याप्रकरणी अधिक चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस अधिकारी एल. एम. सारीपुत्र यांनी दिली. तसेच गुड्डू यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, असेही ते म्हणाले आहेत.