मुंबईतील कुर्ला (Kurla) परिसरातून दोन बनावटी डॉक्टरांना (Fake Doctors) अलीकडेच मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, मुंबई मिररच्या वृत्तानुसार, हे आरोपी अवैध पद्धतीने एक दवाखाना चालवत होते, यामध्ये लिंगनिदान चाचणी (Sex Determination) व गर्भपात (Abortion) करण्यात येत असल्याची खबर पोलिसांना मिळत होती, भारतात या दोन्ही गोष्टी कायदेशीररित्या अवैध आहेत. पोलिसांनी या नकली डॉक्टरांच्या जोडगोळीविरुद्ध काल कुर्ला येथील कोर्टात सुनावणी पार पडली ज्यात त्यांना मोठा दंड आकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रकरणात, पोलिसांना कल्पना होती मात्र मुंबईतील एका वकिलाच्या टीमने स्टिंग ऑपरेशन करून या डॉक्टरांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला, यामध्ये वकिलांनी एका गर्भवती महिलेला विश्वासात घेऊन या दवाखान्यात जाण्यास सांगितले, त्यानुसार या महिलेने आपल्या पोटात मुलीचा गर्भ असल्याने गर्भपात करण्याची इच्छा व्यक्त केली, वास्तविकता ही महिला 24 आठवड्याची गरोदर असल्याने गर्भपात करणे वैध नव्हतेच मात्र तरीही या डॉक्टरांनी यासाठी तयारी दर्शवली. इतकचं नव्हे तर या कामाकरिता त्यांनी महिलेकडे 1 लाख वीस हजार इतकी मोठी रक्कम सुद्धा मागितली.धक्कादायक! Amazon वर होत आहे गर्भपाताच्या औषधांची विक्री; कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
हा सर्व प्रकार महिलेने एका व्हिडीओ मध्ये कैद केला आणि नंतर हाच व्हिडीओ पोलिसांना पुरावा म्ह्णून सादर करण्यात आला.ज्याच्या आधारे पोलिसांनी या दोन्ही डॉक्टरांना अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार या दोघांनाही कोणत्याही प्रकारची मेडिकल पदवी मिळालेली नाही ज्यावरून ते डॉक्टर नाहीत असे सिद्ध होते.
या प्रकरणी आरोपींवर पोलिसांनी आयपीसी कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा तसेच कलम 315 अंतर्गत अर्भकाचा अनैसर्गिक मृत्यू घडवण्याच्या प्रयत्नासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.