Mumbai Crime: कुर्ला हादरले! मोठ्या बहिणीवर जास्त प्रमे असल्याच्या रागात लेकीचे वृद्ध आईवर चाकूने वार; मुलीला अटक

आई फक्त मोठ्या बहिणीवर प्रेम करते आणि माझा तिरस्कार करते या रागातून मुलीनेच आपल्या वयस्कर आईची हत्या केल्याची घटना घडली.

Mumbai Crime: कुर्ला हादरले! मोठ्या बहिणीवर जास्त प्रमे असल्याच्या रागात लेकीचे वृद्ध आईवर चाकूने वार; मुलीला अटक
Death प्रतिकात्मक फोटो Photo Credit- X

Mumbai Crime:  मोठ्या बहिणीवर प्रेम आणि माझा तिरस्कार करते(Jealousy Leads  Murder) म्हणून संतापलेल्या मुलीने आईलाच संपवले. मुलीने आपल्या आईवर चाकूने हल्ला (Daughter Kills Mother)केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चुनाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला अटक केली. पोलिस अधिक तपास करत आहेत.

कुर्ल्याच्या करेशीनगरमध्ये ही घटना घडली. आई फक्त मोठ्या बहिणीवर प्रेम करते आणि माझा तिरस्कार करते या रागातून मुलीनेच आपल्या वयस्कर आईची हत्या केल्याची घटना घडली. सबिरा बानो आझगर शेख (62 वर्षे) असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सबिरा बानो यांची मुलगी रेश्मा मुजफ्फर काजी (41 वर्षे) हिने त्यांची हत्या केली. या घटनेमुळे कुर्ल्यामध्ये खळबळ उडाली आहे.

या घटनेत मृत्यू झालेल्या सबिरा बानो या मुंब्र्यामध्ये आपल्या मुलासोबत राहत होत्या. गुरूवारी रात्री त्या आपल्या मुलीला भेटण्यासाठी कुर्ल्यातील कुरेशीनगरमध्ये आल्या होत्या. यावेळी आपली आई ही आपल्यापेक्षा आपल्या मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम करते आणि आपला तिरस्कार करते या भावनेतून रेश्मा आपल्या आईशी भांडू लागली.

भांडण इतके विकोपला गेले की संतापलेल्या रेश्माने आपल्या आईवर घरातील चाकूने वार केले. या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सबिरा बानो यांचा जागीच मृत्यू झाला. आईची हत्या केल्यानंतर तिने थेट चुनाभट्टी पोलिस ठाणे गाठून आपण आपल्या आईची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेऊन घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केला. रात्री उशिरापर्यंत पोलिस तपास करत होते.

(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2025 09:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).