महाराष्ट्रात कोरोनावर मात केलेल्या परिवारातील मुलांना MIS-C चा धोका
Photo Credit: PTI

देशात अद्याप कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. अशातच दररोजन नव्या नव्या समस्या सध्या उद्भवू लागल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात आता कोविड19 वर मात केलेल्या परिवारातील मुलांमध्ये मल्टिसिस्टिम इन्फामेंट्री सिंड्रोम (MIS-C) ची लक्षणे दिसून येत आहेत. The Time Of India यांच्या रिपोर्ट्सनुसार, नागपूर मध्ये 2-12 वयोगटातील जवळजवळ 6 मुलांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यामध्ये MIS-C ची लक्षणे दिसून आली आहेत. रिपोट्सनुसार, भारतीय चिकित्सका संघाचे यवतमाळचे अध्यक्ष आणि बाल चिकित्सक डॉ. संजीव जोशी यांनी याबद्दल अधिक सांगितले आहे. त्यांनी असे म्हटले की, ज्या परिवाराची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे त्यांच्यामध्ये 'कोविड अँटिबॉडीज' तयार होतात. जी MIC-C चे कारण ठरु शकतात.(Mucormycosis: पुण्यात म्युकरमायकोसीस आजाराचे 300 रुग्ण- अजित पवार)

सध्या या संदर्भातील प्रकरणे फक्त नागपूर, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा येथे समोर आली आहेत. मात्र कोविडमुळे ठिक झालेल्या पालकांना सल्ला दिला जात आहे की, मुलांमध्ये अशी लक्षण दिसून येत असल्यास लक्ष द्या. MIS-C ची लक्षण कावासाकी नावाच्या आजारी सारखी आहेत. त्यामध्ये अंगाची जळजळ होणे, खुप ताप येणे, श्वास घेण्यास त्रास, पोटात दुखणे आणि नखांसह त्वचेवर पिवळे डाग दिसून येणे अशी लक्षणे दिसून येतात. खास गोष्ट अशी की, मुलांची कोविड19 ची चाचणी पॉझिटिव्ह येऊ शकते असे नव्हे. निगेटिव्ह चाचणी आलेल्या मुलांमध्ये सुद्धा ही लक्षणे दिसून येऊ शकतात.(राज्याला कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेचा धोका? पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार)

पालकांना सल्ला दिला जात आहे की, बरे झाल्यानंतर कमीत कमी एक महिना तरी आपली स्वत:ची काळजी घ्या. लक्षात असू द्या या आजाराबद्दल सुरुवातीलाच कळले तर त्यावर इलाज करणे सुद्धा सोप्पे होते. दरम्यान, MIS-C बद्दल अधिक काही कळलेले नाही. परंतु दुसऱ्या लाटेने ज्या प्रकारचे भयानक रुप धाारण केले आहे त्याच्या कारणामुळेच या आजारालासुद्धा कोविड संक्रमणासोबत जोडले जात आहे.