माऊलींच्या भाविकांसाठी आता खास भेट एमएसआरटीसी (MSRTC) कडून देण्यात आली आहे. आता एसटी महामंडळाने मुंबई ते आळंदी नियमित बससेवा ( Mumbai-Alandi Bus Service) सुरू केली आहे. 21 एप्रिल पासून या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. सकाळी 7 वाजता सुटणारी पहिली बस दुपारी दीडच्या सुमारास आळंदीमध्ये पोहचणार आहे. आणि पावणे दोनच्या सुमारास पुन्हा ही बस पुन्हा मुंबईकडे रवाना होणार आहे.
महाराष्ट्रात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आळंदी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी इथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. पण आतापर्यंत मुंबई तून थेट आळंदीला सोडणारी बससेवा नव्हती. आता परिवहन महामंडळाने ही बससेवा सुरू करत भाविकांची मोठी गैरसोय दूर केली आहे. पहिल्याच बससेवेसाठी आलेल्या वाहक, चालकाचा देखील सन्मान करण्यात आला आहे. नक्की वाचा: E Shivneri Bus: यंदा महाराष्ट्र दिन पासून ई शिवनेरी धावणार; पहा नव्या ईलेक्ट्रिक बससेवेचे तिकीट दर.
मुंबई-आळंदी एसटी बसचा मार्ग कसा?
मुंबई सेंट्रल ते देवाची आळंदी ही बससेवा भायखळा (प.) – काळाचौकी – दादर – कुर्ला – घाटकोपर (प.) – मानखुर्द – शिवाजीनगर
(गोवंडी) – सानपाडा – नेरूळ (एल.पी.) – कामोठे – कळंबोली – पनवेल – खोपोली – कार्ला फाटा – तळेगांव डेपो – भंडारा डोंगर – देहू फाटा, श्री क्षेत्र देहू – मोशी – आळंदी देवाची. दरम्यान याच परतीच्या मार्गावरून बस येणार आहे.
आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर यांनी वयाच्या 21 व्या वर्षी जिवंत समाधी घेतली होती. त्या जागी आता एक सुंदर समाधी मंदिर आहे.