E Shivneri | Twitter@avaliyapravasi

मुंबई-पुणे दरम्यान धावणार्‍या शिवनेरी बसच्या (Shivneri Bus) प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. एसटी मंडळाने या बसची आता ईलेक्ट्रिक बस (Electric Bus) सेवा सुरू केली आहे. म्हणजेच 'ई शिवनेरी' (E-Shivneri) सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे सध्या असलेल्या शिवनेरीच्या तिकीटाच्या तुलनेत ई शिवनेरीचे तिकीट कमी असणार आहे. महाराष्ट्र दिन अर्थात 1 मे पासून ही नवी सेवा प्रवाशांच्या सेवेत असणार आहे.

डिझेल बसच्या तुलनेमध्ये इलेक्ट्रिक बस चालवण्याचा खर्च कमी आहे. सध्या भारतामध्ये 'फेम' योजने अंतर्गत राज्य परिवहन महामंडळामध्ये काही बस दाखल करून घेण्यात आल्या आहेत. परिचालन खर्च कमी असल्याने तिकीट दर कमी करून त्याचा लाभ प्रवाशांना मिळावा यासाठी तिकीट दर 70 ते 100 रूपयांनी कमी करण्याचा प्रस्ताव आहे.

मुंबई- पुणे प्रवासाचे सध्याचे तिकीट दर 515 रूपये आहे. शिवनेरी ही महामंडळाच्या ताफ्यातील प्रिमियम बस सेवांपैकी एक आहे. व्होल्वो श्रेणीतील ही बस आरामदायी आणि वेगवान असल्याने अनेकजण त्याला प्राधान्य देतात. वरचे वर मुंबई पुणे प्रवास करणारे अनेक जण नियमित शिवनेरीने फिरतात. त्यामुळे हा प्रवासी कायम राहण्यासाठी ई-बसचे नामकरण ई-शिवनेरी करण्यात आले आहे. नक्की वाचा: Mumbai-Goa Shivshahi AC Bus Update: कोकणात जाणार्‍यांसाठी खूषखबर! एसटी महामंडळाला फायदा मिळवून देणारी मुंबई-गोवा शिवशाही एसी बस कायम होणार! 

ई शिवनेरी बसची क्षमता 43 प्रवाशांची आहे. एकदा बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 300 किमीचा टप्पा पार करू शकेल. ई शिवनेरी देखील पूर्ण वातानुकुलित असणार आहे. आरामदायी आसन व्यवस्था असेल, मोबाईल चर्जिंगची सोय असेल. बॅग ठेवण्यासाठी सवतंत्र व्यवस्था असणार आहे. नव्या ई शिवनेरीचे तिकीट 415-445 रूपये तिकीट असणार आहे.