महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून आता येत्या काही दिवसांत MSBSHSE 10वीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान 16 जुलै दिवशी 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता 10वीच्या विद्यार्थ्यांमध्येही निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दरम्यान निकालाच्या तारखांचा ट्रेंड पाहता 12वीचा निकाल जाहीर झाला की आठवडा भरामध्ये 10 वी निकालाची तारीख जाहीर होते. त्यामुळे पुढील आठवडाभरामध्ये आता10 वी निकाल हाती येईल. दरवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना निकालाच्या दिवशी mahresult.nic.in, maharashtraeducation.com, and mahahsscboard.maharashtra.gov.in.या संकेतस्थळांवर आधी निकाल पाहता येईल त्यानंतर शाळेमध्ये गुणपत्रिका वाटप होणार आहे.
कोरोना संकटाचा प्रभाव यंदा 10 वी निकालावर देखील झाला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांचा भूगोलाचा पेपर रद्द झाला आहे. सोबतच पेपर तपासण्याचे काम देखील मंदावल्याने निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
दहावी निकाल 2020 बद्दल खास गोष्टी
- 12वी प्रमाणेच शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर 10वीचा निकाल जाहीर होईल. विद्यार्थ्यांना ऑनलाईन गुण पाहता येतील. mahresult.nic.in सोबतच काही थर्ड पार्टी साईट्सदेखील उपलब्ध असतील.
- विद्यार्थ्यांच्या शाळा, कॉलेज बंद असल्या तरीही गुणपत्रिका घेण्यासाठी त्यांना शाळेत जावे लागेल. त्यासाठी खास गाईडलाईन जारी केली जाईल.
- विद्यार्थ्यांचा यंदा 10वीचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत अधिक लागण्याची शक्यता आहे. मागील वर्षी 10 वर्षातील सर्वात कमी निकल म्हणजे अवघा 77.10% निकाल लागला होता.
- भूगोलाचा पेपर रद्द झाल्याने त्याचे गुण इतर विषयांच्या तुलनेत सरासरी गुण दिले जातील.
- 11वी साठी ऑनलाईन प्रक्रिया 26-27 जुलै दिवशी सुरू होणार आहे. या दिवसांत विद्यार्थ्यांना फोर्मचा पार्ट 1 भरणं गरजेचे आहे. ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संपवून 11वीचे वर्ग सप्टेंबर महिन्यात सुरू केले जाऊ शकतात.
- 17,65,898 विद्यार्थ्यांनी यंदा 10वीची परीक्षा दिली आहे. ही परीक्षा 9 विभागीय मंडळांमध्ये होते.
दरम्यान 31 जुलै पर्यंत 10वीचा निकाल लावण्याचा मानस शिक्षण मंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र ही तारीख निकालाच्या 1-2 दिवसच आधी जाहीर करण्याची बोर्डाची परंपरा आहे. अद्याप दहावी निकालाची तारीख जाहीर झालेली नाही. लवकरच मंडळाच्या अधिकृत साईट्सवरच त्याचे अपडेट बघायला मिळतील.