Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या समर्थकांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. 'इंडिया टुडे सी व्होटर्स' सोबत 'मूड ऑफ द नेशन' (Mood of the Nation) द्वारे देशभरातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांबाबत नुकताच एक सर्व्हे घेण्यात आला. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यंत्र्यांचाही समावेश आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत शेवटून तिसरा क्रमांक आला आहे. त्यांना देशभरातील केवळ 1.9% लोकांनीच पसंती दर्शवली आहे. महाराष्ट्रातही हा सर्व्हे करण्यात आला. त्यांना राज्यातील किती टक्के लोकांची पसंती आहे हे देखील या सर्व्हेच्या माध्यमातून पुढे आले.

नवीन पटनाईक यांना नागरिकांची देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री

विशेष उल्लेखनीय असे की, ओडिशासारख्या छोट्या राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना नागरिकांची देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून पहिल्या क्रमांकाची पसंती आहे. त्यांच्या राज्यातील 52.7 टक्के जनतेने त्यांना पसंती दिली. ऑगस्टमध्ये झालेल्या सर्व्हेमध्ये त्यांना 61.3 मते पडली होती. 51.3 % नागरिकांची पसंती मिळवत दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. ऑगस्टमध्ये झालेल्या याच सर्व्हेमध्ये त्यांना 46.9% मते जनतेने पसंती दिली होती. तर तिसऱ्या क्रमांकावर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आहेत. ज्यांना 48.6% जनता पसंत करते. ऑगस्टमध्ये झालेल्या सर्वेमध्ये त्यांना 46.9% जनतेने पसंती दिली होती. (हेही वाचा, Best Performing Chief Minister In India: लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातव्या स्थानी; पाहा संपूर्ण यादी)

देशातील टॉप टेन लोकप्रिय मुख्यमंत्री

गुजरातचे मख्यमंत्री भुपेंद्र पटेल चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 42.6% पंसती दर्शवली. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत त्यांची लोकप्रियता घटली आहे. ऑगस्टमध्ये त्यांना 55.3% जनतेने पसंती दर्शवली होती. दरम्यान, त्रिपुराचे मानिक साहा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे पुष्कर सिंह धामी, अरविंद केजरीवाल, एम के स्टॅलिन (तामिळनाडू) आणि ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) हे अनुक्रमे पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत. (हेही वाचा, Sanjay Raut On Ulhasnagar Firing: उल्हासनगर गोळीबारासाठी एकनाथ शिंदे जबाबदार; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाना)

शेवटून तिसरे

दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या टॉप टेन यादीत नाव मिळवता आले नाहीच. परंतू, त्यांना पहिल्या 50 मध्येही स्थान मिळाले नाही. त्यांचे स्थान धक्कादायकरित्या घसरले असून ते शेवटूनतिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. धक्कादायक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील जनतेकडूनच तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिंदे हे जनतेच्या मनात विश्वास संपादन करण्यास कमी पडले आहेत की, काय असा प्रश्न त्यांच्या समर्थकांमध्येच निर्माण होऊ लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ 1.9% लोकांचीच पसंती आहे. एकूण यादी पाहिली तर इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत एकनाथ शिंदे हे शेवटून तिसऱ्या क्रमांकावर आहेत.