Money Laundering Case: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊस वर CBI ची धाड
प्रताप सरनाईक (Photo Credits-Facebook)

मनी लॉडरिंग प्रकरणाध्ये शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या खंडाळामधील फार्म हाऊस वर आज सीबीआयच्या पथकाने छापा टाकला आहे. स्थानिक पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे. या धाडीची माहिती किंवा मदत स्थानिक पोलिसांशिवाय थेट सीबीआय (CBI) ने केली आहे. दरम्यान  या कारवाईमधून नेमकं काय समोर येतय हे पाहणं देखील उत्सुकतेचं आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते व आमदार प्रताप सरनाईक यांच्या टॉप्स सिक्युरिटी मधील आर्थिक घोटाळ्याची चौकशी करण्यसाठी मागील काही महिन्यांपासून ईडी आणि सीबीआय चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. यापूर्वी प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी कडून चौकशी झाली आहे. काही कागदपत्रांची छाननी करण्यासाठी ईडीचे अधिकारी प्रताप सरनाईक यांच्या विविध घरी, कार्यालयांमध्ये गेल्याचंही पहायला मिळालं आहे. दरम्यान प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांना अटकही झाली होती.

दरम्यान टॉप्स ग्रुपकडून MMRDA ला 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच देण्यात आल्याचा आरोप आहे. टॉप्स सिक्युरिटीचे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी 28 ऑक्टोबर 2020 ला त्याबाबत तक्रार दाखल केली असून त्यावरून मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याची माहिती आहे.  टॉप्स सिक्युरिटीकडून 100 पैकी फक्त 70 टक्के गार्ड्स वापरले जात असे  30 टक्के गार्ड्सचा वापर केला जात नव्हता.  असे एकूण 150 गार्ड्स होते आणि त्यांचे पैसेही टॉप्सच्या ग्रुपला मिळतात असे आरोप आहेत. याबाबतच आता ईडी अधिक तपास करत आहे. आजच सकाळी यावरून भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी 'प्रताप सरनाईक गायब?' असा प्रश्न विचारत ट्वीट देखील केले आहे.  नक्की वाचा: Pratap Sarnaik: एमएमआरडीएच्या अहवालानंतर प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा; टॉप्स सिक्युरिटीजकडून कोणताही गैरव्यवहार नसल्याची दिली माहिती.

नोव्हेंबर महिन्यात जेव्हा प्रताप सरनाईक यांना पहिल्यांदा ईडीची नोटीस मिळाली तेव्हापासूनच सरनाईक यांनी या प्रकरणामध्ये चौकशीला सामोरं जाणार आणि संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं बोलून दाखवलं होते. मात्र आज खंडाळ्याच्या फार्म हाऊस वर कोण होतं? सरनाईक कुटुंबापैकी कोण तिथे आहे का? याची माहिती मिळू  शकलेली नाही.