MNS Poster| Photo Credits: twitter

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) सध्या मुंबईच्या दौर्‍यावर आहे. त्याची चर्चा देखील जोरात आहेत. दरम्यान काल मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये (Trident Hotel) अक्षय कुमारची भेट घेतल्यानंतर आज काही बॉलिवुड सेलिब्रिटी, कलाकार, दिग्दर्शक यांच्यासोबतही ते चर्चा आहेत. यामध्येच मुंबईमधील चित्रपटसृष्टी उत्तर प्रदेशात हलवण्याचा त्यांचा मानस असल्याच्या चर्चा देखील रंगू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर काल रात्री मुंबईमध्ये 'चित्रपटसृष्टी युपी ला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्न',अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’असा योगींचा अप्रत्यक्ष उल्लेख करत काही पोस्टर्स झळकलेली दिसली आहे.

मनसे कार्यकर्ते, घाटकोपर पश्चिमचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांचे पोस्टरवर नाव आहे. तर “कहा राजा भोज…और कहा गंगू तेली….”कुठे महाराष्ट्रचं वैभव”….तर कुठे युपीचं दारिद्र्य…असे मनसेने या बॅनरमध्ये म्हटलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपटसृष्टी, युपीला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्नं. अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’,” असा मेसेज मनसेच्या बॅनरवर झळकत आहे. हे बॅनर्स मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत सध्या वास्तव्यास असलेल्या ट्रायडेंट हॉटेल बाहेर, भाजपा कार्यालयाबाहेर झळकली आहेत.

ट्रायडेंट हॉटेल बाहेरील पोस्टरबाजी

आज सकाळी BSE मध्ये जाऊन लखनऊ म्युनिसिपल बॉन्ड ची लिस्टिंग योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

आज शिवसेना मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनीदेखील योगींच्या मुंबई दौर्‍याबाबत बोलताना त्यांनी बॉलिवूडकरांचे बंगले देखील नेणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. सोबतच नोएडा फिल्म सिटीचं काय झालं? असा सवाल विचारत त्यांच्या निशाण्यावर फक्त मुंबई आहे का? असे देखील म्हटलं आहे.