RajThackeray (Photo Credits: File Photo)

काल (गुरुवार, 14 मार्च) संध्याकाळी मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाज महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) जवळील पादचारी पुल कोसळून (Footover Bridge Collapses) झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला तर 36 जण गंभीर जखमी झाले आहेत. या संतापजनक घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. ट्विटरवर एक पत्रक शेअर करत त्यांनी दुर्घटनेबद्दलची चीड, संताप व्यक्त केला आहे. मुंबई सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना छायाचित्रे

या पत्रकात राज यांनी म्हटले आहे की, "छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पूल कोसळला त्यात काहीजण ठार झाले. अनेकजण जखमी झाले ही अत्यंत दुर्दैवी घटना असून मनसे अपघातग्रस्तांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात सामिल असून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे." सीएसएमटी जंक्शन आणि जे.जे. फ्लायओव्हर परिसरातील वाहतूक बंद, 'या' पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं Mumbai Police चं मुंबईकरांना आवाहन

तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील या घटनेबद्दलही रेल्वेमंत्री ट्विटवरुन चौकशीची टिमकी वाजवतील आणि जबाबदारी झटकतील. यात मुंबईकर भरडले जातील, असे म्हणत त्यांनी रेल्वेमंत्री आणि प्रशासनावर निशाणा साधला आहे.

या पत्रकात त्यांनी सप्टेंबर 2017 मध्ये एल्फिन्स्टन रोड स्थानकाजवळील चेंगराचेंगरीत अनेक मुंबईकरांना जीव गमवावा लागला होता तर जुलै 2018 साली अंधेरीतही असाच एक पादचारी पूल कोसळला होता. या दुर्घटनांची आठवण करुन दिली आहे. या दुर्घटनांचा मनसेनी सदनशीर मार्गाने पाठपुरावा केला होता मात्र सदनशीर मार्ग प्रशासनाला समजत नाही, अशी खंत राज यांनी पत्रकातून व्यक्त केली आहे.