CSMT Bridge Collapse (Photo Credits: Twitter)

गुरूवार (14 मार्च) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) स्टेशनच्या  बाहेरील पादचारी पूलाचा (Foot Over Bridge) काही भाग कोसळला. या दुर्घटनेमध्ये सहा जण जखमी तर 36 जखमी रूग्णालयात उपचार घेत आहेत. 60% पूलाचा भाग कोसळल्यानंतर रात्री सुरक्षेचा उपाय म्हणून उर्वरित पूलदेखील पाडण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. या कामासाठी सीएसएमटी परिसरातील वाहतूक वळवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मुंबईकरांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. CSMT Bridge Collapse: रेल्वेमंत्री चौकशीची टिमकी वाजवणार आणि जबाबदारी झटकणार- राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन संतप्त प्रतिक्रीया

सीएसएमटी परिसरात कुठल्या भागातील वाहतूक वळवली?

सीएसएमटी स्टेशनबाहेरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ला जोडणारा पूल कोसळल्याने टाईम्स ऑफ इंडिया बिल्डिंग परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सीएसएमटी जंक्शन ते जेजे फ्लायओव्हर्स या भागातील वाहतूक पुढील काही वेळासाठी बंद ठेवण्यात आली आहे.

सीएसएमटी परिसरातील पर्यायी वाहतूक मार्ग

  • जेजे फ्लायओव्हर्सवरून येणार्‍यांना क्रॉफर्ड मार्केट परिसरात उजव्या बाजूने मेट्रो जंक्शन परिसरात जाता येऊ शकतं.
  • Nesbit junction वरून डाव्या बाजूने जाऊन पी.डी मेलो रोड,अवतार सिंग बेदी चौक वरून सीएसटीच्या लायन गेट परिसरात पोहचता येऊ शकतं. त्यापुढे रिगल जंक्शनवरून सीएसटीला पोहता येईल.
  • चेंबूर परिसरातून ईस्टर्न एक्सप्रेस फ्री वे वरून जीपीओवरून सीएसटी स्थानकापर्यंत पोहचता येऊ शकतं.

सीएसएमटी परिसरातील वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत वळवण्यात आली आहे. त्यामुळे सीएसएमटी परिसरात कामाच्या निमित्ताने येणार्‍यांना, कॉलेज, शाळांमध्ये येणार्‍यांनाही वेळेचं नियोजन करून बाहेर पडावं लागणार आहे.