
मराठी भाषा (Marathi Language) आपल्यासाठी सर्वोच्च मुद्दा आहे. भाषा टीकली तर बाहीच्या गोष्टींना अर्थ आहे. अन्यथा ती भाषाच टीकली नाही तर निवडणुका, युत्या आणि आघाड्यांना काय अर्थ आहे? असा रोखठोक सवाल उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना (UBT) आणि मनसे (MNS) यांच्यातील संभाव्य, युती, आघाडीबाबत भाष्य केले आहेत. राज्य सरकारने शालेय शिक्षणात इयत्ता पहिली ते पाचवी हिंदी भाषा सक्तीची (Hindi Language Compulsion,) करण्याबाबत काढलेला जीआर रद्द केला आहे. त्यामुळे मराठी माणसाने दाखवलेली एकजूट यशस्वी ठरली आहे. ही एकजूट होण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व राजकीय पक्ष, साहित्यिक, नेते, कार्यकर्ते, प्रसारमाध्यमे आणि मराठी माणसाचे ( Marathi Manoos) महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आभार मानले आहेत. ते मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत (सोमवारी, 30 जून) बोलत होते. याच वेळी त्यांनी शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांचा आपणास फोन आल्याचे सांगत त्यांच्यात काय बोलणे झाले, याबाबतही माहिती दिली.
मराठी माणसावरचे संकट
मराठी ही काही दोन अडिच शतकाची भाषा नाही. ती काहीशे शतकांपूर्वीची भाषा आहे. त्यामुळे अशा भाषेला बाजूला सारुन हिंदीसारख्या काहीच वर्षांपूर्वी जन्मलेल्या भाषेला मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या माथी मारले जात असेल तर ते संकट म्हणूनच पाहिले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे मराठी माणसाने तसे पाहिले आणि त्यामुळेच राज्य सरकारला हा जीआर मागे घ्यावा लागला, असे उद्धार राज ठाकरे यांनी काढले. (हेही वाचा, 'महाराष्ट्रात हिंदी लादणे खपवून घेतले जाणार नाही...’; शिवसेना UBT नेत्यांकडून हिंदी भाषा अनिवार्य करणाऱ्या GR ची होळी (Watch Video))
राज्य सरकारने जीआर रद्द केल्यानंतर शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांचा आपल्याला फोन आला होता. त्यांनी विचारले की, जीआर तर रद्द झाला आता पुढे मोर्चाचे काय? यावर मी त्यांना मोर्चा रद्द असे सांगितले. यावर त्यांनी आपण ठरलेल्या तारकेस काही विजयोत्सव साजरा करावयास हवा, असे म्हटले. त्यावर होय, आपण एखादा तसा कार्यक्रम घेऊया म्हणून सांगितले. आता दोन्ही पक्षाचे लोक परस्परांशी बोलतील आणि त्याचे स्वरुप ठिकाण ठरवतील, असेही राज ठाकरे यांनी म्हटले. (हेही वाचा, Raj-Uddhav Thackeray Reunion: 'अद्याप युती नाही केवळ भावनिक संवाद'; संजय राऊत यांनी अटी-शर्थी नसल्याचंही केलं स्पष्ट)
दरम्यान, जीआर रद्द करण्यापूर्वी शिक्षणमंत्री दादा भूसे हे येऊन मला भेटले होते. आमचे म्हणने तरी ऐकूण घ्या असे ते म्हणत होते. मी त्यांना ऐकूण घेऊन पण ऐकणार नाही, असे ठामपणे सागितले. त्यानंतर मोर्चाचे आयोजन झाले, अखेर राज्य सरकारने तो जीआरच रद्द केला, असे ठाकरे म्हणाले.