'महाराष्ट्रात हिंदी लादणे खपवून घेतले जाणार नाही...’; शिवसेना UBT नेत्यांकडून हिंदी भाषा अनिवार्य करणाऱ्या GR ची होळी (Watch Video)

आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, लहान मुलांवर हे ओझे लादणे हा पूर्णपणे मूर्खपणा आहे. आज आम्ही महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीच्या इयत्तेत तीन भाषा अनिवार्य करणारा जीआर (सरकारी ठराव) जाळला.

'महाराष्ट्रात हिंदी लादणे खपवून घेतले जाणार नाही...’; शिवसेना UBT नेत्यांकडून हिंदी भाषा अनिवार्य करणाऱ्या GR ची होळी (Watch Video)
UBT leaders burn govt GR (फोटो सौजन्य - X/ Aaditya Thackeray @AUThackeray)

Shiv Sena UBT leaders Burn Govt GR: महाराष्ट्र सरकारच्या सर्व शालेय वर्गात हिंदी भाषा (Hindi Language) सक्तीची करण्याच्या कथित निर्णयाविरुद्ध शिवसेना (यूबीटी) नेत्यांनी सरकारी ठराव जाळून निषेध नोंदवला. माजी मंत्री आणि शिवसेना-यूबीटी नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सोशल मीडियावर निषेधाचे फोटो शेअर केले. तसेच महाराष्ट्रात हिंदी लादणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात हिंदी भाषा लादणे खपवून घेतले जाणार नाही-

आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, लहान मुलांवर हे ओझे लादणे हा पूर्णपणे मूर्खपणा आहे. आज आम्ही महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीच्या इयत्तेत तीन भाषा अनिवार्य करणारा जीआर (सरकारी ठराव) जाळला. पाचवीपर्यंत कोणतीही नवीन भाषा किंवा विषय पर्यायी असावा आणि कोणतीही भाषा लादणे खपवून घेतले जाणार नाही. आम्ही 5 जुलै रोजी भव्य निषेध आंदोलन आयोजित करणार आहोत, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले. (हेही वाचा -Government Services: राज्यातील नागरिकांना दिलासा! सरकारकडून मिळणाऱ्या सेवांचा प्रतीक्षा कालावधी झाला कमी, जाणून घ्या किती दिवसांत मिळू शकतात कागदपत्रे)

शिवसेना UBT नेत्यांकडून हिंदी भाषा अनिवार्य करणाऱ्या GR ची होळी - 

दरम्यान यापूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांसमोर आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, आम्ही हिंदीला भाषा म्हणून विरोध करत नाही. आम्ही त्याला जबरदस्तीने लादण्यास विरोध करत आहोत. विद्यार्थ्यांना कोणती भाषा शिकायची आहे हे निवडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. आम्ही या तत्त्वाचे समर्थन करतो. तथापी, निषेध मोर्चात सामील होण्याचा सकारात्मक विचार करत आहोत.

(The above story first appeared on LatestLY on Jun 29, 2025 07:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).