मुंबईत टॅक्सी-ऑटोरिक्षा (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (MMRTA) शहरातील विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय (Mumbai International Airport) आणि देशांतर्गत टर्मिनल्सवरून चालवल्या जाणाऱ्या प्रीपेड टॅक्सीच्या (Prepaid Taxi) भाड्यात वाढ केली आहे. मुंबई रस्ते वाहतुक विभागाकडून या संबंधित माहिती देण्यात आली आहे. आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टर्मिनल्सचे किमान भाडे  127 रुपये तर डोमेस्टीक टर्मिनल्सचे (Mumbai Domestic Airport) किमान 85 रुपये होते. सुधारित भाडेवाढीनुसार 6 किमीपर्यंत प्रीपेड टॅक्सीचे (Prepaid Taxi) सुधारित किमान भाडे आंतरराष्ट्रीय टर्मिनलपासून 140 रुपये असेल, तर डोमेस्टीक टर्मिनलपासून 4 किमीपर्यंतचे किमान भाडे 93 रुपये असेल. मुंबई रस्ते वाहतुक विभागाकडून टॅक्सी प्रमाणेच ऑटोच्या भाड्यात देखील वाढ करण्यात आली आहे. यासंबंधित सविस्तर माहिती वाहतुक विभागाकडून देण्यात आली आहे.

 

एमएमआरटीएने 2,000 बसेससाठी स्टेज कॅरेजला मंजूरी दिली आहे. ज्यामुळे बेस्ट अधिक बस चालवण्यास प्रणामी प्रवाशांना उत्तम सुवाधा देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. तसेच मुंबई वाहतुक विभागाकडून मुंबई महानगर परिसरात 92 नवीन टॅक्सी आणि ऑटोरिक्षा स्टँडलाही मान्यता दिलेली आहे.यात ७३ ऑटोरिक्षा, नऊ टॅक्सी स्टँड, सात शेअर ऑटोरिक्षा आणि तीन शेअर टॅक्सी स्टँडचा समावेश आहे. (हे ही वाचा:- Mumbai: मुंबईतील साहित्य चाचणी लॅब एनएबीएल प्रमाणपत्राची मानकरी, केंद्र सरकारकडून एनएबीएल बहुमान पटकावणारी बीएमसी राज्यातील पहिली महापालिका)

 

तरी तुम्ही मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासह डोमेस्टीक विमानतळावरुन प्रवास करायचा प्लॉन करत असाल तर हो ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण वाहतु विभागाच्या  भाडेवाढीच्या निर्णयानंतर मुंबईकरांच्या खिशाला आणखीच कात्री बसणार आहे. पण सोबतचं नव्याने सुरु होत असलेल्या टॅक्सी, ऑटो आणि बेस्टच्या सुविधेमुळे आता गर्दीचा कमी सामना करावा लागणार असुन मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे.