शहरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई (Mumbai) महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत आणखी एक हजार खाटांची सुविधा असलेले कोविड रुग्णालय तयार करण्यात आले आहे. एमएमआरडीएने वांद्रे-कुर्ला संकुलाच्या (BKC) मैदानावर केवळ 15 दिवसांत कोविड19 रुग्णालय (COVID19 Hospital) उभारले आहे. या रुग्णालयात उपचार करण्याची, तसेच अतिदक्षता विभागाची सुविधादेखील देण्यात आली आहे. ज्या रुग्णांना अलगीकरण आणि विलगीकरणाची गरज आहे, तसेच अत्यवस्थ नसणारे रुग्ण अशांसाठी एमएमआरडीएमार्फत नुकतीच पहिल्या टप्प्यातील एक हजार खाटांची सुविधा तयार करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील या सुविधेच्या जवळच आता दुसऱ्या टप्प्यातील आणखी 1 हजार खाटांचे रुग्णालयाचे काम एमएमआरडीएने हाती घेतले आहे.
कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने वांद्रे- कुर्ला संकुलाच्या मैदानात कोरोना रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. यातच कोरोना उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे. बीकेसी येथे एमएमआरडीएने 15 दिवसांत देशातील पहिले कोरोना ओपन रुग्णालय तयार करण्यात आले आहे. या रुग्णालयात 1 हजार खाटांची सुविधा देण्यात आली आहे. तसेच अतिदक्षता विभागात 200 खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्य शासनाच्या संकेत स्थळावर देण्यात आली आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्र सरकारकडे 'श्रमिक स्पेशल' ट्रेनने पाठवायच्या स्थालांतरितांची यादी तयार नाही, हेच सत्य आहे! पियुष गोयल यांची जोरदार टीका
ट्वीट-
#COVID_19 उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती.
✅ बीकेसी येथे एमएमआरडीने १५ दिवसांत उभारले देशातील पहिले ओपन हॉस्पिटल. १ हजार बेड्सची सुविधा, याच ठिकाणी २०० बेड्सची आयसीयू सुविधाही. pic.twitter.com/C2mudBMEBq
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 25, 2020
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे दिवसागणिक कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. महाराष्ट्रात आज 2436 नवे रुग्ण आढळून आले असून 60 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 52,667 वर पोहचला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 1695 जणांनी आपला जीव गमावला आहे.