महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश काही दिवस कायम राहणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. परंतु हातावर पोट असणाऱ्या स्थलांतरित कामगारांनी लॉकडाउनच्या काळात काही उत्पादनाचे साधन नसल्याने घरची वाट पकडली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारकडून स्थलांतरित कामगारांना आपल्या घरी पाठवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. श्रमिक स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून बहुतांश स्थलांतरित कामगार आणि मजूर वर्गाला पाठवण्यात आले आहे. परंतु रविवारी उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून स्थलांतरित कामगारांसाठी स्पेशल ट्रेनची मागणी केली जात आहे. परंतु केंद्राकडून याबाबत वेळ लागत असल्याचे म्हटले होते. 'श्रमिक स्पेशल ट्रेन साठी उद्धव ठाकरे यांनी 1 तासात मजुरांची यादी द्यावी, आवश्यक तेवढ्या रेल्वे पुरवू', रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे महाराष्ट्र सरकारला आश्वासन दिले.
पियुष गोयल यांनी महाराष्ट्र सरकारकडे स्थलांतरित कामगारांची यादी मागितली होती. तसेच 125 गाड्यांची तयारी केली असता फ्त 46 ट्रेन्सची यादी मिळाली असून 41 ट्रेन सोडाव्या लागणार असल्याचे पियूष गोयल यांनी म्हटले होते. कारण अन्य पाच ट्रेन या पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथे जाणाऱ्या असून तेथे अम्फान चक्रीवादळ थैमान घालत असल्याचे गोयल यांनी म्हटले होते.(Lockdown: रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा निशाणा म्हणाले, 'राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका')
The reality is, Maharashtra Government has no list, no details of migrants, no clarity on who wants to go where. It is a completely broken administration.
I only appeal to the leadership to provide the list so I can give 125 trains: @PiyushGoyal
— Piyush Goyal Office (@PiyushGoyalOffc) May 25, 2020
रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केलेल्या ट्वीटवरुन त्यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना उत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी असे म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेनसाठी स्थलांतरित कामगारांची लिस्ट दिली आहे. मात्र गोयल जी तुम्हाला माझे निवेदन आहे की, स्थलांतरित कामगारांना घेऊन जाणारी ट्रेन त्यांच्या गंतव्य स्थानकापर्यंत जावी. नाहीतर गोरखपूर येथे जाणारी ट्रेन ओडिशाला जाऊन पोहचेल.