मीरा- भाईंदर (Mira Bhayander) भागामध्ये एका ऑन ड्युटी ट्राफिक पोलिसासोबत गैरवर्तन करत त्याच्यासोबत अर्वाच्च भाषेत बोलण्याप्रकरणी एका जोडप्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. नो पार्किंगमध्ये असलेल्या गाडीला जॅमर लावल्याने भडकलेल्या एका जोडप्यने पोलिसाला दोन तुकडे करीन अशी भाषा वापरली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल झाला आहे. पोलिसांनी देखील तरूणाला ताब्यात घेत जेरबंद केल्यानंतर दोघांचे डोके ठिकाण्यावर आले आहे. दोघांनीही रडत पोलिसांची माफी मागितल्याचा देखील व्हिडिओ आता समोर आला आहे.
दरम्यान टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, पोलिसांसोबत उद्धट वर्तन करणार्याचं नाव अमर सिंह आहे तर त्याच्यासोबत त्याची पत्नी मीना सिंह देखील होती. तिने देखील पोलिसांसोबत अयोग्य भाषेत संभाषण केले आहे. मीना गरोदर असल्याने तिला पोलिसांनी अटक न करता समज देऊन सोडल्याचं म्हटलं आहे.
मीरा रोड मध्ये ही घटना 8 जुलै दिवशीची आहे. अमरने नो पार्किंग झोन मध्ये गाडी लावली होती. पोलिसांनी चालक जवळ नसल्याने कारवाई केली. तेव्हा हा प्रकार पाहून दोघेही तातडीने तिथे आले. पोलिसांनी माफी मागण्याऐवजी, नियमांनुसार प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी दोघांनीही अरेरावीची भाषा करत पोलिसाला जीवेमारण्याची भाषा केली. दरम्यान या सार्या घटनेचा व्हीडिओ काही प्रत्यक्षदर्शींनी शूट केला. Body Worn Cameras: राज्यात वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांच्या गणवेशावर असणार कॅमेरे; नियमांचे पालन न करणाऱ्यांवर होणार कडक कार्यवाही.
मीरा-भाईंदर मधील प्रकाराचा वायरल व्हिडिओ
पोलिसांनी कारवाई करत अमरला अटक केली त्यानंतर मात्र त्याची वागणूक पूर्णतः बदलली. अमरने पोलिसांची माफी मागितली पण त्यासोबतच तो रडताना देखील दिसला. आज अमरला कोर्टात दाखल केले जाणार आहे. पोलिसांनी अमर विरूद्ध कलम 353 लावले आहे.