महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी रविवारी नागपुरातील (Nagpur) एका कार्यक्रमात वाहतूक पोलिसांना ‘बॉडी वॉर्न कॅमेरे' (Body Worn Cameras) वाटप केले. त्यांनी सांगितले की, अशा उपकरणांमुळे रस्त्यावर शिस्त लावण्यास मदत होईल. यामधील फुटेज नियमांचे उल्लंघन करणार्यांविरूद्ध पुरावे म्हणून वापरता येईल. वाहतूक पोलिसांना त्यांचे काम चोखपणे बजावता यावे यासाठी बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांची मदत होणार आहे. नागपूरप्रमाणे इतर शहरांनाही वाहतूक सुव्यवस्थेसाठी लवकरच बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात येतील, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केले.
अशा कॅमेरांमुळे कायद्याचे अंमलबजावणी करणारे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांमधील मतभेदही कमी होतील, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, शहरात 163 ट्रॅफिक सिग्नल असून कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी 6,688 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पोलिसांना काही दिवसांत ड्रोनही मिळणार आहेत. त्यांनी माहिती दिली की, वाहतूक नियम मोडणाऱ्या लोकांकडून 16 कोटी रुपये दंड प्रलंबित असून ही रक्कम वसूल करण्यासाठी लवकरच एका खासगी एजन्सीशी करार केला जाईल.
आज नागपूर पोलीस आयुक्तालयात बॉडी वोर्न कॅमेरा प्रदान समारंभ माझ्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधला. या कॅमेरांचा पोलिसांना निश्चितच लाभ होईल, याची मला खात्री आहे. यावेळी नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.@NagpurPolice pic.twitter.com/6IEtzCops4
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 17, 2021
यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, बऱ्याचदा वाहनधारक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. अशा वेळी पोलिसांनी थांबविल्यास वाद निर्माण होतो. काही वेळेस हल्लेही होतात. अशा प्रसंगी शहरात पोलिसींग करणाऱ्या पोलिसांना बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांची मदत होणार आहे. या कॅमेरांमध्ये रेकॉर्डिंगची सुविधा आहे. वाहतूक शाखेचे पोलीस कर्तव्यावर असताना आपल्या गणवेशावर बॉडी वॉर्न कॅमेरा लावतील. रेकॉडिंग सिस्टिम असल्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर आता कडक कार्यवाही करण्यात येईल.
आगामी काळात वाहतूक पोलिसांना मदत करणारे स्वयंसेवक (ट्रँफिक वार्डन) ही संकल्पना शहरात राबविण्यात येइल. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी घोडयावरुन गस्त घालणारे पोलीसांचे युनिट सुरु करण्यात येईल. संचार कम्युनिकेशन सिस्टीमचे हर्ष लाहोटी यांनी यावेळी सादरीकरण करुन बॉडी वॉर्न कॅमेऱ्याचे महत्त्व समजून सांगितले.