Prajakt Tanpure Tested COVID 19 Positive: महाविकास आघाडी सरकामधील नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोना विषाणूची लागण
MLA Prajakt Tanpure (PC - Facebook)

Prajakt Tanpure Tested COVID 19 Positive: महाविकास आघाडी सरकामधील राष्ट्रवादी नेते तथा नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोनाला हरवून लकवरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार, असा विश्वासदेखील तनपुरे यांनी व्यक्त केला आहे. प्राजक्त तनपुरे हे राहुरी मतदारसंघाचे आमदार आहेत.

प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या. कोरोनाला हरवून लकवरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार.' (हेही वाचा - महाराष्ट्र सरकारकडून मास्क आणि कोविड19 च्या चाचणीसाठी आकारण्यात येणारे दर कमी करण्याचा प्रयत्न)

दरम्यान, आजपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. परंतु, यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केवळ दोन दिवस अधिवेशन चालणार आहे. याशिवाय आज शिवसेनाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचदेखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. महेंद्र दळवी आज पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावणार होते. मात्र, त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते माघारी फिरले. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षण जाणवत नाहीत. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी स्वत: ला होम क्वारंटाईन केलं आहे.