Pune Mini Lockdown: पुण्यात आजपासून पुढील 7 दिवस मिनी लॉकडाऊन, काय बंद राहणार आणि काय मुभा मिळणार?; वाचा सविस्तर
Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) मागील वर्षीपेक्षा अधिक क्षमतेने धुमाकूळ घातला असल्याने राज्यात कोरोना रुग्णांची संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. काल (2 एप्रिल) दिवसभरात 47,827 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 29 लाख 04 हजार 076 वर पोहोचली आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे यामुळे पुणे जिल्ह्यात आजपासून पुढील 7 दिवसांसाठी मिनी लॉकडाऊन (Mini Lockdown in Pune) ठेवण्यात आला आहे. यात संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 12 तासांसाठी ही संचारबंदी ठेवण्यात आली आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व गोष्टी बंद राहणार आहेत.

या मिनी लॉकडाऊनच्या वेळेत पुण्यातील हॉटेल, रेस्टॉरन्ट, बार पूर्णत: बंद राहतील. केवळ होम डिलिव्हरी हा पर्याय उपलब्ध असेल. तसेच पुढील सात दिवस कुठलेही राजकीय वा धार्मिक कार्यक्रम होणार नाही. अंत्यविधी आणि लग्नसमारंभ सोडल्यास अन्य कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रम करता येणार नाही. यात अंत्यविधी करता केवळ 20 लोकांनाच उपस्थित राहण्याची मुभा असेल. तर लग्नसमारंभासाठी केवळ 50 लोकांनाच उपस्थित राहता येईल.हेदेखील वाचा- CM Uddhav Thackeray Live Update: पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय पण आज त्याबद्दल जाहीर करत नाही- उद्धव ठाकरे

याचबरोबर पुण्यात 30 एप्रिल पर्यंत शाळा, कॉलेज बंद राहणार आहेत. पण 10 वी 12वी च्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहेत. पुणे शहरामध्ये पीएमपीएमएल बस (PMPML Bus Service) सेवा बंद राहणार आहे. पण एसटी सेवा (ST Bus Service) ही सुरू राहणार आहे.

कार्यालयं नियमित वेळेनुसारच सुरू राहतील असे सांगण्यात आले आहे. पोलिस देखील नियमांचं उल्लंघन करणार्‍यांना माणूसकीच्या दृष्टीने दंड देतील असे राव यांनी म्हटले आहेत. विनाकारण घराबाहेर पडणा-या लोकांवर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार आहे. कार्यालयं नियमित वेळेनुसारच सुरू राहतील असे सांगण्यात आले आहे.