आज 17 व्या लोकसभा अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यात विविध राज्यातून निवडून आलेल्या खासदारांनी आपआपल्या भाषेतून शपथ घेतली. यात औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी खासदार पदाची शपथ मराठी भाषेतून घेतली. (डॉ. अमोल कोल्हे, प्रितम मुंडे यांच्यासह अन्य खासदारांनी घेतली मराठी भाषेतून शपथ)
पहा व्हिडिओ:
या शपथविधी कार्यक्रमात भाजपाच्या अनेक खासदारांनी संस्कृत आणि हिंदी भाषेत शपथ घेतली. तर शिवसेनेसह इतर पक्षांच्या खासदारांनी मराठी भाषेतून शपथ घेतली.
20 वर्षांपासून शिवसेनेकडे असलेला औरंगाबाद यंदा एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी काबीज केला. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना इम्तियाज जलील यांना औरंगाबादच्या जनतेने खासदार म्हणून निवडून दिले.