समान नागरी कायदा म्हणजे काय? विषयावर दैनिक सामानात अग्रलेख लिहून दाखवा असुद्दीन ओवेसी यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान
Asaduddin Owaisi (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला विरोधांकडून एकमेकांवर हल्ला बोल करण्यात येत आहे. याच परिस्थितीत आता एमआयएम (MIM) पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी शिवसेना  (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक मोठे आव्हान दिले आहे. असदुद्दीन यांनी असे म्हटले आहे की, दैनिक सामनात येणाऱ्या अग्रलेखात तुम्ही समान नागरी हक्क म्हणजे काय? या विषवार लिहूनच दाखवा असे एका प्रचार रॅलीच्या सभेवेळी विधान केले आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे असदुद्दीन यांनी दिलेले आव्हान स्विकारणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नांदेड येथे बुधवारी झालेल्या एका सभावेळी ओवेसी यांनी महायुतीवर प्रथम जोरदार टीका केली. तर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सभेत भाजप अध्यक्षांना समान नागरी कायदा लागू करणार असल्याचे म्हटले आहे. यावर आता असदुद्दीन यांनी निशाणा साधला असून नागरी कायदा बाबात तुम्ही आता अग्रलेख लिहून दाखवा असे आव्हान उद्धव ठाकरे यांना दिले आहे.(कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ: शिवसेनेला हादरा युतीला दणका; 26 नगरसेवकांचा राजीनामा, बंडखोर उमेदवाराला जाहीर पाठींबा)

ओवेसी यांच्याबाबत बोलायचे झाल्यास निवडणूकीच्या रणधुमाळीत ते सध्या राज्यभरातील विविध ठिकाणी त्यांच्या सभा घेत आहेत. दरम्यान सरकारवर ही जोरदार टीका त्यांच्याकडून करण्यात येत आहे. एमआयएम हा वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडली असल्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी युतीसाठी आम्ही कधीही तयार आहोत असे म्हटले आहे. परंतु इम्तियाज जलील यांनी आघाडीमधून एक्झिट घेण्याचा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्रात येत्या 21 ऑक्टोंबरला विधानसभा निवडणूक पार पडणार असून त्याचा निकाल 24 ऑक्टोंबरला जाहीर करण्यात येणार आहे.