महाराष्ट्र: Lockdown च्या भीतीने अनेक स्थलांतरित मजूरांनी धरली गावाकडची वाट, रेल्वे पूर्णपणे बंद होण्याच्या भीतीने घरी जाण्याची लागलीय घाई
Migrant Workers (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता लवकरच राज्यात कडक लॉकडाऊन (Loहोऊ शकतो अशी भीती सध्या नागरिकांच्या मनात आहे. परिस्थिती आटोक्यात आली नाही तर राज्यात लॉकडाऊन करावा लागेल असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिल्यानंतर राज्यातील असंख्य स्थलांतरित मजूरांनी (Migrant Workers) गावाकडची वाट धरली आहे. मागच्या वर्षीप्रमाणे स्थिती उद्भवून रेल्वे कधीही बंद होतील या भीतीने स्थलांतरित मजूर आपल्या कुटूंबाला घेऊन गावाकडच्या परतीच्या वाटेवर निघाले आहेत. त्यामुळे गेल्या 2 दिवसात राज्यात अनेक रेल्वे स्थानकांवर स्थलांतरित मजूरांची गर्दी पाहायला मिळत आहे.

गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट भारतात येताच लोकलसह लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या ताबडतोब बंद करण्यात आल्या. त्यातच अनेकांच्या नोक-या गेल्या. लॉकडाऊन सर्व कामे ठप्प झाली. त्यामुळे बेरोजगार झालेल्या स्थलांतरित मजूरांनी पायी जात गावाकडचा रस्ता पकडला. यात अनेक मजूरांना आपला जीवही गमवावा लागला. ती परिस्थिती याही वर्षी उद्भवू शकते या भीतीने हे मजूर आधीच रेल्वेने आपल्या गावी जात आहे.हेदेखील वाचा- Break The Chain उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड-19 च्या नियंत्रण व व्यवस्थापनासाठी जारी केल्या खास मार्गदर्शक सूचना

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता कोरोनाचे निर्बंध करण्यात आले आहेत. तसेच नाइट कर्फ्यूही सुरु आहे. त्याचबरोबर 30 एप्रिलपर्यंत शुक्रवारी संध्याकाळी 7 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. ही सर्व परिस्थिती पाहता आधीच सावधगिरी बाळगून येथील स्थलांतरित मजूरांनी परतीचा प्रवास सुरु केला आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून काल (4 एप्रिल) ला आणखी 57 हजार 74 कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 222 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 30 लाख 10 हजार 597 वर गेली आहे. यापैंकी 55 हजार 878 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 25 लाख 22 हजार 823 जणांनी कोरोनावर मात केली आहे.