MHT CET 2020 साठी cetcell.mahacet.org वर 29 फेब्रुवारी पर्यंत करू शकता ऑनलाईन अर्ज; परीक्षा 13 एप्रिल पासून
Representational Image (Photo Credit: unsplash.com)

MHT CET 2020 Online Registration: इंजिनियरिंग, फार्मसी, कृषी अशा विविध अभ्यासक्रमांसाठी आवश्यक महाराष्ट्र सीईटी या प्रवेशपरीक्षेच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरूवात झाली आहे. 7 जानेवारी 2020 पासून cetcell.mahacet.org वर रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान यंदा MHT CET 2020 परीक्षा 13 ते 17 एप्रिल आणि 20 ते 23 एप्रिल अशा दोन टप्प्यात पार पडणार आहे. Maharashtra CET 2020 Exam Time Table: महाराष्ट्र सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक cetcell.mahacet.org वर जाहीर; MHT-CET ते MAH - MBA/MMS CET परीक्षा पहा कधी होणार?

MHT CET 2020 मध्ये ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुरूवात 7 जानेवारीपासून झाली आहे. तर 29 फेब्रुवारी पर्यंत हे अर्ज दाखल करता येऊ शकतात. विद्यार्थ्यांना 5 एप्रिलला अ‍ॅडमिट कार्ड्स दिले जातील तर परिक्षांची सुरूवात 13 एप्रिलला होणार आहे.

MHT CET 2020 ऑनलाईन अर्ज कसा कराल?

  • cetcell.mahacet.org ही अधिकृत वेबसाईट ओपन करा.
  • MHT CET 2020 या होमपेजवरील लिंकवर क्लिक करा. त्यानंतर नवं पेज ओपन होईल.
  • तुम्ही याआधीच साईन अप केलं असेल तर लॉगिन करा.
  • त्यानंतर अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरा.
  • त्यानंतर सबमीट बटण वर क्लिक करा.

ऑनलाईन अर्जासाठी 29 फेब्रुवारीपर्यंत वेळ दिला असला तरीही विलंब शुल्कासह 1-7 मार्च दरम्यान अर्जासाठी मुदत आहे. तर सीईटी परीक्षेचे शुल्क ऑनलाईन भरता येणार आहे. तर परीक्षेचा निकाल 3 जून दिवशी जाहीर होण्याची शक्यता आहे.