Maharashtra CET 2020 Exam Tentative Dates: महाराष्ट्रात इंजिनियर, लॉ, एमबीए सह शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या सहा सीईटी परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले cetcell.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक हे संभाव्य असून लवकरच अंतिम वेळापत्रक देखील जाहीर केले जाणार आहे. ऑनलाईन माध्यमातून घेतल्या जाणार्या या सहाही सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्याच्या 'राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष' द्वारा घेतल्या जाणार आहेत. इंजिनियरिंग, फार्मसीसाठी आवश्यक MHT-CET 2020 ही परीक्षा 13 ते 17 एप्रिल 2020 आणि 20 ते 23 एप्रिल 2020 दरम्यान पार पडणार आहे. यासोबतच MAH - MBA/MMS CET - 2020, MAH-MCA-CET 2020,MAH-M.Arch-CET 2020,MAH-B.HMCT 2020,MAH-M.HMCT 2020 या परीक्षांचे देखील संभाव्य वेळापत्रक ऑनलाईन जाहीर करण्यात आले आहे. पहा महाराष्ट्र राज्यातील 12 वी परीक्षांचं अंतिम वेळापत्रक आणि नवी गुणपद्धती काय असेल?
महाराष्ट्रातील सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक
विषय | परीक्षेचं नाव | परीक्षेची संभाव्य तारीख | परीक्षेचं स्वरूप |
इंजिनियरिंग, फार्मसी आणि डेअरी सायन्स | MHT-CET 2020 | 13 ते 17 एप्रिल 2020
20 ते 23 एप्रिल 2020 |
Online |
मास्टर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन/ मास्टर इन मॅनेजमेंट स्टडीज | MAH - MBA/MMS CET - 2020 | 14 आणि 15 मार्च 2020 | Online |
मास्टर इन कम्प्युटर अॅप्लिकेशन | MAH-MCA-CET 2020 | 28 मार्च 2020 | Online |
मास्टर इन आर्किटेक्चर | MAH-M.Arch-CET 2020 | 10 मे 2020 | Online |
बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट | MAH-B.HMCT 2020 | 10मे 2020 | Online |
मास्टर इन हॉटेल मॅनेजमेंट | MAH-M.HMCT 2020 | 16 मे 2020 | Online |
सीईटी परीक्षा संभाव्य वेळापत्रक सह अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
यंदा बारावीच्या परीक्षा महाराष्ट्रामध्ये 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 या महिन्याभराच्या काळात पार पडणार आहे. दरम्यान बारावी परीक्षेसोबतच सीईटी आणि अन्य प्रवेश परीक्षा यांचे एकत्रित गुण पाहून राज्यभर इंजिनियरिंग सह अन्य अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रकिया पार पडते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचं आणि इतर नियोजन योग्य रित्या करता यावं यासाठी मंडळाकडून संभाव्य परिक्षा वेळापत्रक आगाऊ जाहीर करण्याची पद्धत आहे. यंदा 12वी परीक्षेच्या गुणपद्धतीमध्येही शिक्षण मंडळाकडून बदल करण्यात आले आहेत.