MSBSHSE 12th Exam Pattern: 12 वी परीक्षा अनेकांच्या करियरला मोठी कलाटणी देणारा टप्पा असतो. नुकतेच शिक्षण मंडळाकडून यंदाच्या महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 18 फेब्रुवारी 2020 पासून यंदा बारावीची परीक्षा (HSC Exam) सुरू होणार आहे. ही परीक्षा 18 मार्च 2020 पर्यंत चालणार आहे. पण यंदा बारावी परीक्षेच्या गुणपत्रिका, परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता परीक्षेच्या तयारीच्या वेळेस या नव्या बदलांना लक्षात घेऊनच अभ्यास करायला सुरूवात करा.
शिक्षण मंडळाने ऑगस्ट 2019 मध्ये जाहीर केलेल्या नियामांनुसार यंदा 12 वी परीक्षा 650 ऐवजी 600 गुणांची घेतली जाणार आहे. हा नवा नियम शैक्षणिक वर्ष 2019-20 आणि शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून इयत्ता बारावी साठी लागू करण्यात येईल. सध्या हे अतिरिक्त 50 गुण पर्यावरण शास्त्र विषयास देण्यात येत आहेत. त्याऐवजी नव्या शैक्षणिक वर्षापासून याचे श्रेणी पद्धतीमध्ये दिले जाणार आहेत. अन्य केंद्रीय मंडळांचा अभ्यासक्रम याचा अभ्यास करुन विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक विषय योजना व मूल्यमापन पद्धती अस्तित्वात आणण्यासाठी समितीकडून करण्यात आलेल्या शिफारशींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
12 वी परीक्षा वेळापत्रक 2020
बारावीचे व्होकेशनल परीक्षेचे संपुर्ण वेळापत्रक
ज्युनिअर कॉलेज आणि त्यानंतर उच्च माध्यमिक शाळा स्तरावर नवे नियम लागू करण्यात आले आहेत. बारावीची अंतिम परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारीत असेल. या परीक्षेत किमान 25% बहुपर्यायी/वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश करण्यात येणार आहे.
बारावीची परीक्षा यंदा 18 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा 3 मार्च पासून सुरू होणार आहे.