MHADA Pune Lottery 2021 Result Out: स्वतःचे हक्काचे घर ही प्रत्येकाची गरज झाली आहे. मानवी जीवनातील अन्न-वस्त्र-निवारा या तीन मूलभूत गरजांमधील आजकालची ही महत्त्वाची गरज मानली जाते. दिवसभर काबाडकष्ट करून थकूनभागून येणारा माणूस स्वतःच्या घरात येतो, तेव्हा विश्रांतीचे व समाधानाचे क्षण अतुलनीय असतात. यातच पुण्यात गृहस्वप्न साकारण्यासाठी म्हाडाच्या लॉटरीत अर्ज केलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने (म्हाडा) 2 हजार 908 सदनिकांसाठी लॉटरी पद्धतीने ऑनलाइन सोडत आज (2 जुलै 2021) काढण्यात आली आहे. म्हाडाच्या या लॉटरीसाठी अर्ज केलेल्या नागरिकांना भाग्यवान विजेत्यांची यादी पाहण्यासाठी खालील माहिती उपयोगी ठरणार आहे.
म्हाडा पुणे विभाग सोडत आज 2908 घरांसाठी जाहीर करण्यात आली आहे. हा निकाल घरबसल्या तुम्हांला MHADA Lottery 2021 या युट्युब चॅनेल वर दाखवण्यात आला आहे. तसेच भाग्यवान विजेत्यांना एसएमएसद्वारा अलर्ट्स मिळाले आहेत. तर, उशिरा विजेत्यांची यादी देखील म्हाडा च्या अधिकृत संकेतस्थळावर अपडेट करण्यात आली आहे. हे देखील वाचा- Pune Unlock: पुण्यातील कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी
भाग्यवान विजेत्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, सदनिकांसाठी 14 मेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. मात्र, कोरोनामुळे एक महिना मुदतवाढ देण्यात आली. या कालावधीत 57 हजार नागरिकांनी अर्ज केले होते. पुण्यासह सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये 'म्हाडा'च्या 2 हजार 153 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील 755 सदनिका अशा 2 908 सदनिकांचा यात समावेश होता.