Mega Block on Sunday, January 5, 2025: मध्य रेल्वे, हार्बर, वेस्टर्न आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 पर्यंत लागू असेल, ज्यामुळे माटुंगा आणि मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरील रेल्वे सेवा 15 मिनिटे विलंबाने होईल. सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे ते पनवेल दरम्यानच्या ट्रान्सहार्बर सेवा या कालावधीत बंद राहतील. सीएसएमटी-वाशी सेक्शनवर विशेष गाड्या धावतील. ठाणे-वाशी/नेरूळ दरम्यान रेल्वे धावतील. प्रवाशांना त्यानुसार प्रवासाचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मध्य रेल्वे, हार्बर आणि वेस्टर्न लाईनवर उद्या मेगा ब्लॉक