2 आणि 3 फेब्रुवारीला पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; तब्बल 11 तास लोकल सेवा बंद
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मुंबई: सुरक्षा पाहणीत धोकादायक ठरलेल्या लोअर परळच्या पुलाचे बांधकाम येत्या शनिवारी आणि रविवारी होणार आहे. या कामामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल 11 तासांचा महाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. 2 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते 3 फेब्रुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या मेगा ब्लॉकदरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्व जलद लोकल लोकल विरार, डहाणू ते दादरपर्यंत चालविण्यात येतील. चर्चगेट ते दादर दरम्यान जलद मार्गावरून एकही लोकल धावणार नाही. बोरीवली, भार्इंदर, विरार ते वांद्रेपर्यंत धीम्या लोकल चालवण्यात येतील. त्यामुळे तर का उद्या आणि परवा दादर ते चर्चगेट असा प्रवास करणार असाल तर लोकलचे वेळापत्रक नक्की पहा.

अंधेरीच्या गोखले पुलाची पादचारी मार्गिका कोसळल्यानंतर प्रसाशानाने धोकादायक पुलांचे काम हाती घेतले. यात लोअर परळचा डेलीस पूल गंजला असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता या पुलाचा सांगाडा काढण्यासाठी शनिवार, 2 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजल्यापासून रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत तब्बल 11 तासांचा पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 10 पासूनच ब्लॉकमध्ये चर्चगेट ते दादर ही वाहतूक 11 तासांसाठी संपूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. (हेही वाचा : मध्य रेल्वेची मुंबई-नाशिक लोकलसेवा चाचणी यशस्वी, कल्याण – इगतपुरी दरम्यान धावणार लवकरच ट्रेन

या कामामुळे मेल आणि पॅसेंजर गाड्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

2 फेब्रुवारीला रद्द गाड्या - मुंबई सेंट्रल - अहमदाबाद पॅसेजर, मुंबई सेंट्रल - इंदौर दुरोन्तो एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल - राजकोट दुरोन्तो एक्स्प्रेस, अहमदाबाद - मुंबई सेंट्रल पॅसेंजर, राजकोट - मुंबई सेंट्रल दुरोन्तो एक्स्प्रेस

3 फेब्रुवारीला रद्द गाड्या - मुंबई सेंट्रल-अहमदाबाद गुजरात एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल - वलसाड फास्ट पॅसेंजर, वलसाड - मुंबई सेंट्रल फास्ट पॅसेंजर, अहमदाबाद - वलसाड गुजरात क्वीन एक्स्प्रेस, इंदौर-मुंबई सेंट्रल-दुरोन्तो एक्स्प्रेस