Mumbai - Nashik Local Trial Run: मुंबई, पुण्यापाठोपाठ आता नाशिक, औरंगाबाद ही शहरं झपाट्यानं वाढत आहे. औद्योगिकरणाच्या आजच्या जगात आर्थिक राजधानी मुंबईमध्ये नियमित ये-जा करणार्या चाकरमान्यांची संख्या वाढत आहे. नियमित मुंबई-नाशिक (Mumbai - Nashik Local) प्रवास करणार्यांचा प्रवास सुलभ व्हावा याकरिता लवकरच मध्य रेल्वेची लोकल सेवा नाशिकपर्यंत विस्तारीत होणार आहे. नुकतीच या मार्गावरील पहिली चाचणी यशस्वी ठरली आहे.
मुंबईतून नाशिककडे प्रवास करणार्यांना लवकरच कल्याण - इगतपुरी (Kalyan - Igatpuri) अशी लोकलसेवा मिळणार आहे. मध्यरेल्वेने नुकतीच या मार्गावर चाचणी केली आहे. अनेक नाशिककरांना इतर रेल्वे सेवांच्या माध्यमातून नाशिकमधील महत्त्वाच्या स्थानकांवर उतरून पुढील प्रवास पर्यायी साधनांनी करावा लागत होता मात्र आता लोकल सेवेमुळे ही सुविधा शक्य होणार आहे. मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस आता नाशिकमार्गे धावणार , मध्य रेल्वेवर धावणारी पहिली राजधानी एक्सप्रेस
यापूर्वी कसारा नाशिक लोकलसेवेची मागणी करण्यात आली होती मात्र आता ही लोकलसेवा तोट्यात जाईल या भीतीने आता कल्याण - इगतपुरी मार्गावर मध्य रेल्वे लोकलसेवा देणार आहे. रेल्वे बोर्डाने तंत्रज्ञ, प्रवासी आणि अधिकारी यांच्या मागण्या, सूचना यांचा विचार करून ही लोकलसेवा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.