Shivsena | (Photo courtesy: archived, edited images)

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना(Shiv Sena)-भाजप (BJP) युती होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र येत्या आठवड्याभरात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) आणि जेपी नड्डा (HP Nadda) यांच्यात युती जागावाटपाची चर्चा होणार आहे. त्यामुळे कोणत्या आणि किती जागांवर युतीमधील कोणाचा उमेदवार लढणार हा मुद्दा प्रथम मांडला गेला.

परंतु जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार याबाबत आता अधिक चर्चा केली जाणार आहे. याबाबत शिवसेना-भाजप पक्षाच्या जेष्ठ नेत्यांमध्ये होणार आहे. तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 9 सप्टेंबरला मुंबईत जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची बैठक पार पडणार आहे.(महायुतीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये खलबते सुरु; जागावाटपाबद्दलची पहिली बैठक फिसकटली, जाणून घ्या काय असेल फॉर्म्युला)

तसेच आगामी विधानसभेसाठी मजहाराष्ट्रातून 288 जागांपैकी भाजप-शिवसेना मध्ये 270 जागा आणि घटक पक्षासाठी 18 जागा लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान भाजपला 160, शिवसेना 110 आणि घटक पक्ष 18 जागांवर लढतील असा अंदाज पार पडलेल्या चर्चेतून समोर आला आहे.खा. संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या भेटीदरम्यानच्या एका घटनेची आठवण करून देत, युतीमध्ये दोन्ही पक्ष समान जागा लढवतील असे ठरले असल्याचे सांगितले आहे. असो आता पुन्हा एकद दोन्ही पक्षांमध्ये बैठका होऊन युतीचा नवा फॉर्म्युला ठरवला जाणार आहे.