Coronavirus: सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती व उपाययोजनांसंदर्भात कराड येथे बैठकीचे आयोजन- राजेश टोपे

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) हाहाकार माजवला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आणि पुणे शहरात आढळून आले आहेत. सध्या मुंबईतील कोरोनाबाधितांची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तर, पुणे शहरात कोरोनाचे जाळे पसरतच चालले आहे. पुणे पाठोपाठ सातारा (Satara) आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या वेगाने वाढू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती व उपाययोजनांसंदर्भात कराड येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. यांनी दिली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सहकार मंत्री व पालकमंत्री सातारा बाळासाहेब पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील,आरोग्य राज्य मंत्री श्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, दोन्ही जिल्ह्यातील लोकसभा व राज्यसभा सदस्य,विधानसभा व विधानपरिषद सदस्य इत्यादी लोकप्रतिनिधी तसेच आरोग्य प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास व वरीष्ठ अधिकारी उपस्थित आहेत

भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण केवळ महाराष्ट्रात आढळून आले आहेत. राज्यात कोरोनाची परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार ठोस पावले उचलली जात आहेत. दरम्यान, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून एका दिवसाला 8 ते 10 हजार रुग्णांची आढळून आले आहेत. ज्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. हे देखील वाचा-Coronavirus cases In Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 98 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; एकूण कोरोनाबाधितांची संख्या 16 हजार 588 वर पोहोचली

राजेश टोपे यांचे ट्विट-

महाराष्ट्रात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. आज राज्यात 12,822 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 275 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 5 लाख 3 हजार 84 इतका झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 47 हजार 48 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 17 हजार 367 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.