प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

Coronavirus cases In Aurangabad: राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, औरंगाबाद, जळगाव, जालना आदी जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मराठवाड्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 98 नव्या रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 16 हजार 588 वर पोहोचली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील 12 हजार 146 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. याशिवाय 539 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या जिल्ह्यात 3 हजार 903 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. (हेही वाचा - Cylinder Blast in Pimpri-Chinchwad: पिंपरी चिंचवड येथील दिघी भागात झालेल्या सिलेंडर स्फोटात एकाचा मृत्यू; 13 जण जखमी)

दरम्यान, आज खासगी रुग्णालयात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात जिल्ह्या प्रशासनाने माहिती दिली आहे. आज सकाळी आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपैकी ग्रामीण भागातील 61 जणांचा तर शहरी भागातील 37 जणांचा समावेश आहे. आज शहरातील खासगी रुग्णालयांत सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील 64 वर्षीय महिला व 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तसेच कन्नडमधील 55 वर्षीय महिला व बीड बायपास येथील 75 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.