Cylinder Blast in Pimpri-Chinchwad: पिंपरी चिंचवड येथील दिघी भागात झालेल्या सिलेंडर स्फोटात एकाचा मृत्यू; 13 जण जखमी
Cylinder Blast | Image only representative purpose (Photo Credits: Pxhere)

पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथील दिघी (Dighi) भागात आज (9 ऑगस्ट) सकाळी सिलेंडरचा स्फोट झाला. या भयंकर स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवडच्या अग्निशमन दलाने (Fire Brigade) ही माहिती दिली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हा स्फोट नेमका कसा झाला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

काल उल्हासनगरमधील एका वडापावच्या दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत एकाचा व्यक्तीचा मृत्यू झाला. तर 11 जण गंभीररित्या जखमी झाले होते. दुकानाचे मालक रविंद्र गुप्ता यांना त्वरीत जवळच्या सेंटर्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ANI Tweet:

दरम्यान आज सकाळी आंध्र प्रदेशात मधील विजयवाडा येथील कोविड सेंटरला आग लागल्याने 10 जणांचा मृत्यू झाला आहे.  तर 30 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून त्यांना जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. रिपोर्टनुसार, विजयवाडा येथील स्वर्णा पॅलेज हॉटेलचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करण्यात आले होते. तेथे 22 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते.