आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) विजयवाडा येथील एका कोविड-19 सेंटरला (COVID-19 Centre) आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 30 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शोक व्यक्त करत जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. पंतप्रधानांनी ट्विटच्या माध्यमातून या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमधून विजयवाडा दुर्घटनेत मरण पावलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांविषयी शोक व्यक्त केला आहे. तसेच आपण लवकरात लवकर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यासह या घटनेबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत आणि शक्य तितकी सर्वोतोपरी मदत करणार आहे असे आश्वासन दिले आहे. Andhra Pradesh Fire: आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील कोविड-19 सेंटरला आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू
Anguished by the fire at a Covid Centre in Vijayawada. My thoughts are with those who have lost their loved ones. I pray that the injured recover as soon as possible. Discussed the prevailing situation with AP CM @ysjagan Ji and assured all possible support.
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2020
ही दुर्घटना पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. या कोविड सेंटरमध्ये सुमारे 22 रुग्णांवर उपचार सुरु होते. दरम्यान आम्ही संपूर्ण इमारत रिकामी करत असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक अहवालातून समोर येत आहे. परंतु, याची निश्चिती करावी लागेल, अशी माहिती कृष्णा डीसी मोहम्मद इम्तियाज यांनी दिली आहे.