Andhra Pradesh Fire: आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील कोविड-19 सेंटरला आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू
Andhra Pradesh Fire (Photo Credits: ANI)

आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) विजयवाडा (Vijayawada) येथील एका कोविड-19 सेंटरला (Covid-19 Center) भीषण आग लागल्याची घटना समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 30 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून त्यांना जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रिपोर्टनुसार, विजयवाडा येथील स्वर्णा पॅलेज हॉटेलचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करण्यात आले होते. तेथे कोरोना व्हायरस बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते.

ही दुर्घटना पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. या कोविड सेंटरमध्ये सुमारे 22 रुग्णांवर उपचार सुरु होते. दरम्यान आम्ही संपूर्ण इमारत रिकामी करत असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक अवहालातून समोर येत आहे. परंतु, याची निश्चिती करावी लागेल, अशी माहिती कृष्णा डीसी मोहम्मद इम्तियाज यांनी दिली आहे.

ANI Tweet:

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जनग मोहन रेड्डी या दृघटनेची पाहाणी करत आहेत. तसंच आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान आंध्रपदेशातील कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. राज्यात एकूण 2,17,040 कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यापैकी  85,486 अॅक्टीव्ह केसेस असून 1,29,615 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 1,939 मृतांची नोंद झाली आहे.