Kapol Bank Fire: मुंबईतील अंधेरी (Andheri) परिसरातील कपोल बॅंकेत (Kapol Bnak) आग लागल्याची घटना समोर आली आहे. पहाटे साडेचार वाजता बॅंकेत आग लागल्याचे समोर आले आहे. बॅकेत कोणतेही कर्मचारी नव्हते त्यामुळे कोणतेही जीवितहानी झाली नाही. आग इतकी भंयकर होती त्यामुळे काही क्षणांतच फर्निचर आणि काही कोटींची रक्कम जळाली आहे. अंधेरी परिसरातील बॅंकेत आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुसळधार पावसाने शॉटसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. राज्यात ठिकठिकाणी पावसाने थैमान माजवले आहे.
मुंबईतील अंधेरी परिसरातील कपोल बॅंकेत पहाटे साडेचार वाजता आग लागली. पहाटे कर्मचारी बॅंकेत नव्हते त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. आग नियंत्रित करण्यात आले. कोणतेही जीवितहानी झाली नाही परंतु बॅंकेतील मौल्यवान वस्तू आणि काही कोटी रुपयांची रक्कम जळाली आहे. पोलिसांना ही माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतला.
परिसरात आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. आग कश्यामुळे लागली याचे उत्तर अद्याप समोर आले नाही. जवांनानी आग नियंत्रित केले आहे. आता कुलुंगचे काम सुरु आहे. आग लागली तेव्हा स्थानिकांनी वेळीच सावध राहत पोलिसांना आणि अग्निशमन दलाच्या जवानांना फोन केला. अंधेरी भागात आग लागली असल्यामुळे परिसरात अशांतता पसरली आहे. घटनेनंतर कपोल बँकेतील कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यानंतर आगीच्या घटनेत नेमकं किती नुकसान झालंय, याची तपासणी घेतली जात आहे.