Fire Caught MIDC Factory In Sinnar (PC - X/ANI)

Fire Engulfs MIDC Factory In Sinnar: नाशिक (Nashik) मधील सिन्नर (Sinnar) येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ( Maharashtra Industrial Development Corporation (MIDC)) कारखान्यात शुक्रवारी भीषण आग (Fire) लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. सिन्नरच्या मुसळगाव येथील एमआयडीसी आवारात असलेल्या आदिमा प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यात (Adima Private Limited Factory) ही घटना घडली. या आगीमुळे आकाशात धुराचे लोट पसरले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मुसळगाव सिन्नर द्रुतगती मार्गावर असलेल्या आदिमा ऑरगॅनिक्स कारखान्यात दुपारी चारच्या सुमारास आग लागली. घटनेच्या वेळी एकूण 20 ते 25 कर्मचारी कामावर हजर होते. आग आटोक्यात आणण्यासाठी पाच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. (हेही वाचा -Fire In Perfume Factory in Himachal: हिमाचलमधील परफ्यूम फॅक्टरीला भीषण आग, 15-20 कामगार अडकले (Watch Video))

दरम्यान, आगीमुळे तुरळक स्फोटही झाले, ज्यामुळे परिसरात घबराट आणि गोंधळ उडाला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

पहा व्हिडिओ - 

तथापी, सुदैवाने कारखान्यातील सर्व 50 ते 60 कामगार सुखरूप असल्याची माहिती मिळाली असून या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती मिळताचं सिन्नर नगर परिषदेचे अधिकारी व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.