Martyr Sangram Patil Funeral in Nigwe,Kolhapur: शहीद संग्राम पाटील यांचे पार्थिव कोल्हापरमध्ये दाखल, निगवे गावात होणार अंत्यसंस्कार
Martyr Sangram Patil | (Photo Credits: @NorthernComd_IA)

जम्मू कश्मीर (Jammu and Kashmir) येथील राजोरी भागात पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात राज्याच्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील निगवे खालसा (Nigwe) गावचे सुपूत्र संग्राम पाटील शहीद (Sangram Patil) झाले. संग्राम पाटील यांच्यावर आज (23 नेव्हेंबर) अंत्यसंस्कार (Martyr Sangram Patil Funeral Kolhapur करण्यात येणार आहेत. संग्राम पाटील यांचे पार्थिव कोल्हापूरातील निगवे खालसा या त्यांच्या जन्मगावी दाखल झाले आहेत. त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. गावातील चनिशेटी विद्यालयाच्या प्रांगणात हा अंत्यविधी पार पडणार आहे.

पाकिस्तानने राजोगी भागात21 नोव्हेंबर या दिवशी 16 मराठा पोस्टवर भ्याड हल्ला केला. या वेळी भारतानेही पाकिस्तानच्या नापाक हककतील तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. परंतू यात कोल्हापूरचे संग्राम पाटील यांना वीरमरण आले. दरम्यान, शहीद झाल्यानंतर दोन दिवसांनी संग्राम यांचे पार्थिव विमानाने पुणे विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर ते पार्थिव कोल्हापूरात आणण्या आले. (हेही वाचा, जम्मू कश्मीर: राजौरी सेक्टर मधील गोळीबारात कोल्हापूरच्या संग्राम पाटील यांना वीरमरण)

संग्राम पाटील हे नेहमी हसतमुख आणि सर्वांशी मनमीळावू पणे वावरणारे व्यक्तीमत्व म्हणून परिसरात प्रसिद्ध होते. भारतीय सैन्यात ते हवालदार पदावर कार्यरत होते. पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई, वडील असा परिवार आहे.