Urmila Kothare | (Photo Credit- instagram)

मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Cinema) अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) यांच्या वाहनास अपघात (Urmila Kanetkar Car Accident) झाला आहे. या अपघातामध्ये एक कामगार ठार तर दोन ठार झाले आहेत. ही घटना मुंबई येथील कांदिवली पोइसर मेट्रो स्थानक परिसरात शुक्रवारी (28 डिसेंबर) रात्री घडली. प्राप्त माहितीनुसार, कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. ज्यामध्ये स्वत: उर्मिला कानेटकर (कोठारी) (Urmila Kothare-Kanetkar Car Accident) आणि त्यांचा वाहनचालकही जखमी झाला आहे. या अपघातातील पीडित मेट्रो कामगार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

वाहनचालकावर पोलिसांची कारवाई

उर्मिला कोठारे कानेटकर यांच्या वाहनाचा अपघात घडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुंबईतील समता नगर पोलिसांनी वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अपघात घडला त्या मेट्रो स्थानकाजवळून या कारने कामगारांना धडक दिली. ही घटना घडली त्या वेळी कार भरधाव वेगाने जात होती. दरम्यान, "कारच्या एअरबॅग उघडल्याने उर्मिला कानेटकरचा जीव वाचवला", असे एका पोलीस सूत्राने सांगितले, अपघाताच्या तीव्रतेमुळे वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले. (हेही वाचा, 'तुझेच मी गीत गात आहे' मालिका उर्मिला कोठारे ने सोडली का? यावर अभिनेत्रीनेच दिलं व्हीडिओ शेअर करत 'हे' उत्तर!)

मुंबईची घटना हादरवून सोडणारी

दरम्यान, या दुःखद अपघातामुळे रहिवाशांना धक्का बसला असून अनेकांनी परिसरातील बेपर्वाईने वाहन चालवल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मेट्रोचे कामगार या ठिकाणी काम करत असताना भरधाव वेगातील कारने त्यांना धडक दिली. त्यामुळे या रस्त्यावरुन धावणाऱ्या वाहनांच्या वेगांवर मर्यादा लावावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. (हेही वाचा, महेश कोठारे यांचा झपाटलेला चित्रपट पाहताना त्यांची नात जिजा ने दिलेली 'ही' मजेशीर प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर, Watch Video)

अपघातांमध्ये दिसून येणारी विविध कारणे

राज्यामध्ये दररोज कोठे ना कोठे अपघात होत असतो. ज्यामध्ये निरापराध नागरिकांचा बळी जाताना दिसतो. दरम्यान, अनेक अपघातांमध्ये साधर्म्य असते. ज्यामध्ये मद्यपान अथवा अंमली पदार्थांचे सेवन करुन वाहन हाकने, भरधाव वेगाने वाहन हाकने, वाहतूक नियमांचा भंग करुन वाहन हाकने, वाहनाची योग्य वेळी देखभाल-दुरुस्ती करण्यास प्राधान्य न देणे, परवाना नसताना वाहन हाकने, यांशिवाय इतरही अनेक बाबींचा समावेश आहे. ज्यामुळे अपघातांच्या घटना वाढत असतात. पोलीस आणि अनेक संस्था, संघटनांकडून जनजागृती करुनही अपघाताच्या घटना घडतच असतात.

कोण आहेत उर्मिला कोठारे-कानेटकर

उर्मिला कानेटकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. जे दुनियादारी, शुभमंगल सावधान आणि ती साध्या के करते यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी ज्येष्ठ चित्रपट निर्माते महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे यांच्याशी विवाह केला आहे.