'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेतून अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) पुन्हा छोट्या पडद्यावरून रसिकांच्या भेटीला आली आहे. पण नुकत्याच काही एपिसोड मध्ये उर्मिला साकारत असलेल्या पात्राचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आल्याने तिच्या चाहत्यांमध्ये, काही मीडीया रिपोर्ट्समधून उर्मिलाने मालिका सोडल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण या सार्या अफवा आहेत. उर्मिलाने एक व्हिडिओ शेअर करत आपण मालिका सोडलेली नाही. तिचा मृत्यू हा कथानचाच भाग आहे. पण आगामी मालिकेत उर्मिला रसिकांना तिच्या लेकीच्या आठवणींमधून भेटत राहणार आहे असं तिने स्पष्ट केले आहे.
‘तुझेच मी गीत गात आहे’या मालिकेमध्ये उर्मिला कोठारे 'वैदेही' हे पात्र साकारत आहे. तिची लेक स्वरा आणि वैदेही ही आई-मुलीची जोडी आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुलीच्या भविष्यासाठी 'वैदेही' झटत असते. या पात्रासाठी उर्मिला अनेकदा नो मेकअप लूक आणि अत्यंत साध्या अंदाजात कॅमेर्यासमोर आली आहे. हे देखील नक्की वाचा: Hruta Durgule Clarification: 'मी मालिका सोडलेली नाही'; ‘मन उडू उडू झालं’ मालिका सोडल्याच्या चर्चांवर हृता दुर्गुळेचं स्पष्टीकरण .
उर्मिला कोठारेचं स्पष्टीकरण
View this post on Instagram
दरम्यान ‘तुझेच मी गीत गात आहे’ही मालिका मराठी टेलिव्हिजन वरील पहिलीच म्युझिकल आहे. संगीताच्या आजूबाजूनेही या मालिकेत अनेक घडामोडी घडत असतात. त्यामुळे पुढे या मालिकेची कहाणी कशी रंगणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे. या मालिकेत बालकलाकार अवनी जोशी आणि अन्वी तायवडे आहेत. तर त्यांच्यासोबत प्रिया मराठे आणि अभिजित खांडकेकर देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.