Narayan Rane On Manoj Jarange Patil: 'मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम', नारायण राणे यांची टीका
Narayan Rane On Manoj Jarange Patil | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे महत्त्वाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचााजचा पाचवा दिवस आहे. पाठिमागील 10 फेब्रुवारीपासून ते उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती कमालीची खालावली आहे. त्यांच्या नाकातून रस्तस्त्राव होऊ लागला आहे. अशा परिस्थीत त्यांना वैद्यकीय उपचारांची सक्त गरज असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. दरम्यान, राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. या टीकेमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय म्हटले आहे नारायण राणे यांनी?

नारायण राणे यांनी आपल्या एक्स हँडलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्‍याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्‍हा महाराष्‍ट्रात येतील त्‍यावेळी जागेवरुन हलून दाखव. तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत.'' (हेही वाचा, Maratha Reservation: मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला!)

जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत (Antarwali Sarathi) येथे उपोषण सुरु केले आहे. त्यांची प्रकृती कमालीची खालावली आहे. अशा वेळी त्यांच्यावर वैद्यकीय उपचारांची सक्त गरज आहे. असे असताना जरांगे यांनी मात्र वैद्यकीय उपचारांना नकार दिला आहे. जरांगे यांनी आपल्या प्रकृतीला जपावे त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत, अशी विनंती उपस्थित ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनीकेली आहे. (हेही वाचा, Maratha Reservation: सोनपेठ येथील पोलिस भरती करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उचलले टोकाचं पाऊल)

राणेंच्या टीकेवर नेटकऱ्यांकडून संताप

दरम्यान, नारायण राणे यांनी केलेल्या एक्सपोस्ट आणि टीकेवरुन मराठा समाजातून संताप व्यक्त केला जातो आहे. अनेकांनी नारायण राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत आपला संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर नारायण राणे यांच्याबद्दल अनेक मिम्सही व्हारल झाले आहेत. दरम्यान, या वक्तव्यावर नारायण राणे काही प्रतिक्रिया देतात का याबाबत उत्सुकता आहे.

एक्स पोस्ट

मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबीत आहे. राज्य सरकारने हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन मराठा समाजाला दिले आहे. मात्र, हा विषय मार्गी लावण्यात अद्याप तरी सरकारला यश आले नाही. दुसऱ्या बाजूला राज्य सरकार विधिमंडळाचे एक अधिवेशन बोलावण्याची शक्यता आहे. या अधिवेशना आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वांगीण चर्चा होणे अपेक्षीत आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.