१९ जानेवारी म्हणजेचं गेल्या गुरुवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर होते. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईतील सुमारे ३८,८०० कोटी रुपयांच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण सोहळा पार पडला झाले. शहरातील विविध ठिकाणी पंतप्रधान मोदींनी भेट दिली. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्पेक्स येथे पंतप्रधान मोदींची भव्यदिव्य रॅलीसह मोठा कार्यक्रम पार पडला. तरी देशाचे पंतप्रधानांचा हा कार्यक्रम असल्याने मुंबई पोलिसांकडून तगडी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. तरी मुंबई पोलिस, मुंबई क्राईम ब्रान्च, एटीएस हे सगळे सुरक्षा व्यवस्थेत सज्ज होते. तरी पंतप्रधान मोदीची वांद्रें-कुर्ला कॉम्पलेक्स वरील रॅली सुरु होण्याच्या दिड तासांपूर्वी एका ३५ वर्षिय अज्ञातास अटक करण्यात आली. तरी अटक करण्यात आलेला हा इसम बीकेसी परिसरात भारतीय सैनिकांच्या वेशात फेऱ्या मारत होता.
सैनिक वेशातील हा इसम बोगस आहे, भारतीय सैन्यातील हा जवान नसल्याचं मुंबई पोलिसांना जागीचं संशय आला आणि त्यांनी त्या बहिरुपी सैनिकास जागीचं अटक केली. तरी या बोगस सैनिक व्हीव्हीआयपी परिसरात शिरण्याचा प्रयत्न करत असताना मुंबई पोलिसांनी या अज्ञातास ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांकडून या अज्ञातावर भारतीय कायद्या अंतर्गत १७१, ४६५, ४६८,४७१ गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (हे ही वाचा:- PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे अनेकांना मनस्ताप, मेट्रो 1 बंद राहिल्याने सुमारे 55 हजार प्रवाशांना फटका)
Mumbai: Man arrested ahead of PM Modi's rally for posing as soldier from Guards Regiment of Army
Read @ANI Story | https://t.co/NTEmOAsREL#Mumbai #PMModi #GuardsRegiment #rally pic.twitter.com/nFHG60EiZJ— ANI Digital (@ani_digital) January 21, 2023
काल या संशयितास वांद्रे कोर्टासमोर हाजर करण्यात आलं असुन कोर्टाने त्याला २४ जानेवारी पर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. तरी मुंबई पोलिस या अज्ञातासह संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमा दरम्यान काही घातपाताचा कट होता, कैदेत असलेला हा अज्ञात एकटाचं आहे की आणखी याच्या बरोबर विविध लोक आहेत ह्याचा तपास सध्या मुंबई क्राईम ब्राण्च आणि मुंबई पोलिस करीत आहेत.