Malad Wall Collapse Incident: मालाड दुर्घटनेत 21 जणांचा नाहक बळी, जखमींची संख्या पोहचली 78 वर, अग्निशमन दलाचे बचावकार्य अद्याप सुरु
Mumbai Rain (Photo Credits: ANI)

मुंबईतील मुसळधार पावसामुळे मालाड (Malad) येथे पिंपरीपाडा (Pimpripada) परिसरात काल मध्यरात्री इमारतीची संरक्षक भिंत कोसळली होती. आता याच मालाड दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढून 21 वर तर जखमींची संख्या 78 च्या वर गेली आहे. या दुर्घटनेतील जखमींवर शताब्दी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये महिला व बालकांचा सुद्धा समावेश आहे, काही वेळापूर्वीच एका महिलेला कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्या खालून सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. या ठिकाणीअद्याप बचावकार्य सुरु असून अत्याधुनिक उपकरणांचा वापर केला जात आहे, मात्र घटनास्थळीची जागा अरुंद असल्याने बचावकार्यात अडचण येत आहे.

दरम्यान, आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील जखमींची भेट घेतली होती. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5  लाखाची मदत सुद्धा जाहीर करण्यात आली आहे.Maharashtra Monsoon 2019: 'मुंबईकरांनो पुढील दोन तीन दिवस धोक्याचे, सांभाळून राहा' - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ANI ट्विट

महाराष्ट्राला झोडपून काढलेल्या पावसाने मालाडप्रमाणेच कल्याण आणि पुण्यातही भिंत कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. या सर्व घटनांमध्ये एकत्रितरित्या तब्बल 30 हुन अधिकांना प्राण गमवावे लागल्याचे समजत आहे.